Auto Rikshaw Driver : कुंटनखान्यात विकायला आणणाऱ्या तरुणीची रिक्षा चालकाने ‘अशी’ केली सुटका

रिक्षा चालकाने उत्सुकतेपोटी कशाला पाहिजे कुंटनखाना असे विचारले असता त्याने अमन याने सोबत असलेल्या मुलीकडे इशारा करून तिला तिकडे सोडायचे असल्याचे सांगितले.

171

रिक्षा चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका अठरा वर्षीय तरुणीची एका जोडप्याच्या तावडीतून सुटका करण्यात मुंबईतील टिळक नगर पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशातून आलेले हे जोडप्याने या तरुणीला कुंटनखाना येथे विकण्याचा घाट घातला होता, मात्र वेळीच रिक्षा चालकाने पोलिसांना कळविल्यामुळे या तरुणीचे आयुष्य बरबाद होता होता वाचले.

अमन शर्मा (२१) आणि आंचल शर्मा (२०) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघे पती पत्नी असून त्यांना आठ महिन्याचे बाळ आहे, दोघे उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात राहणारे आहे.शनिवारी पहाटे हे जोडपे स्वतःचे आठ महिन्याचे मुलं आणि अठरा वर्षाच्या तरुणीसह कुर्ला टर्मिनस येथे उतरले होते,अमन शर्मा याने पत्नीला आणि सोबत असलेल्या तरुणीला रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभे करून रिक्षा स्टंड जवळ आला, तेथील एका रिक्षा चालकाला गाठून त्याने मुंबईत जवळपास कुंटनखाना कुठे आहे असे विचारले. रिक्षा चालकाने उत्सुकतेपोटी कशाला पाहिजे कुंटनखाना असे विचारले असता त्याने अमन याने सोबत असलेल्या मुलीकडे इशारा करून तिला तिकडे सोडायचे असल्याचे सांगितले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच रिक्षाचालकाने स्वतःच्या मोबाईल फोनवरून पोलिसांना कॉल केला, काही वेळातच टिळक नगर पोलीस कुर्ला टर्मिनस येथे दाखल झाले. व अमन शर्मा सह तिघांना पोलिस ठाण्यात आणून अठरा वर्षाची पीडित तरुणी कडे चौकशी केली असता, अमन तीचा प्रियकर असून त्याच्यासोबत असलेली महिला ही त्याच्या मोठ्या भावाची पत्नी असल्याचे सांगून अमन आणि मी मुंबईत लग्न करण्यासाठी आलो असल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले.

(हेही वाचा Veer Savarkar : अंश तू माझा, वंश तू माझा…स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार स्वीकारताना भावविभोर झाल्या हुतात्मा मेजर कौस्तुभ राणेंच्या आई)

पोलिसांनी अमन शर्माकडे कसून चौकशी केली असता, त्याने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तीला लग्नाचे अमिष दिले व मुंबईत तीला कुंटनखाना येथे ४०हजार रुपयांमध्ये विकणार होता, त्यात त्याची पत्नी देखील सामील असल्याचे सांगितले.अमनने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबामुळे पीडित तरुणीला धक्काच बसला आणि आपली फसवणूक करण्यात आल्याचे कळताच तीने स्वतःहून पोलीस ठाण्यात अमन शर्मा आणि आंचल शर्मा विरुद्ध तक्रार दाखल केली. टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पीडित तरुणीची महिला सुधारगृहात रवानगी करून अमन शर्मा आणि आंचल शर्मा या दोघांना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.