नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Centre scam) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (३ ऑगस्ट) रोजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोविड घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल असे सांगितले होते. त्यानंतर आज म्हणजेच शनिवार (५ ऑगस्ट) रोजी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्थानकात हा गुन्हा (Covid Centre scam) नोंदवण्यात आला आहे. तसेच किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
(हेही वाचा – महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानके होणार आधुनिक, पंतप्रधान करणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदघाट्न)
मुंबई महापालिकेने कोविड काळात (Covid Centre scam) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचलनालय (ED) म्हणणं आहे. यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार : किरीट सोमय्या
दरम्यान किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार, असं किरीट सोमय्या म्हणाले. तसेच सोमय्या पुढे बोलतांना म्हणाले की; “आम्ही या संबंधिची तक्रार मुंबई पोलिसांना केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा (Covid Centre scam) तपास सुरु आहे. यावरही कारवाई होणार आहे. आधी संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community