credit card: राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशातच बनावट कागदपत्रांच्या (Fake paper) आधारे बँकेकडून ५५ क्रेडिट कार्ड घेऊन एक कोटी २६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेने (Crime Branch) आसाममधील अतीसंवेदनशील आणि गुन्हे पार्श्वभूमी असलेल्या पाच गावांमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे. (credit card)
(हेही वाचा – इटलीच्या पंतप्रधानांनी घेतली Donald Trump यांची भेट ; जॉर्जीया मेलोनी यांचे केले कौतुक)
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील आरोपींनी गेल्यावर्षी २३ फेब्रुवारी ते २० जून या काळात एका बँकेकडून ५५ क्रेडिट कार्ड मिळवली. या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून बँकेची एक कोटी २६ लाख ९८ हजार ३२७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. बँकेचे उपाध्यक्ष नयन भगदेव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी (Azad Maidan Police) अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने हा गुन्हा तपासासाठी वर्ग करून घेतला आणि तपासाला सुरुवात केली. आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे प्राप्त केलेल्या क्रेडिट कार्डचा वापर ऑनलाईन खरेदीसाठी केला. तसेच काही रक्कम इतर बनावट बँक (Bank) खात्यात वळती केल्याचे उघड झाले.
(हेही वाचा – ‘लिव्हिंग विल’ परत मिळविण्यासाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, Bombay High Court चे सरकारला आदेश)
गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस निरीक्षक शामराव पाटील, कक्ष दोनचे पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे यांनी आरोपींनी वापर केलेल्या बँक खात्यांचे स्टेटमेंट, केडिट कार्डचा वापर केलेली ठिकाणे, गुन्हा करताना वापरलेले मोबाइल यांचा तांत्रिक तपास करून आरोपींची माहिती गोळा केली. त्यानंतर तपासासाठी पोलीस पथक स्थापन करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने आसाममध्ये जाऊन स्थानिक लहरीघाट पोलिसांच्या मदतीने मोरगाव जिल्ह्यातील अमरागुरी, लालीपथ्थर, हत्याराबोरी, तातीपोरा आणि कारीमरी या पाच गावांतून पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community