Crime: धाराशिवमध्ये २ कोटींचा दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले

५ पैकी ४ दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

194
Crime: धाराशिवमध्ये २ कोटींचा दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले
Crime: धाराशिवमध्ये २ कोटींचा दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले

धाराशिव शहराच्या मध्यवर्ती असलेल्या क्रांतीज्योती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र (Crime) दरोडा टाकून लाखो रुपयांच्या सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २ कोटी रुपये आहे.

शनिवारी, धाराशिव शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलाजवळ ज्योती क्रांती सहकारी क्रेडीट सोसायटी लि. बँक आहे. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बँकेतील कर्मचारी काम करत असताना अज्ञात ५ व्यक्ती बँकेत घुसल्या. त्यांनी आपल्याकडील पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. त्यानंतर काही क्षणांतच सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड घेऊन पसार झाले. ५ पैकी ४ दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

(हेही वाचा – Drone Attack: लाल समुद्रात हुथी बंडखोरांकडून आणखी एका जहाजावर ड्रोन हल्ला)

घटनेती माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, वासुदेव मोरो, आनंदनगर ठाण्याचे पोलीस बांगर घटनास्थळी दाखल झाले. यानंतर श्वान पथक ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.