Crime : ड्रगमाफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्या २ पोलिसांना अटक

104
Manipur Police: भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७ जण मणिपूर पोलिसांच्या ताब्यात

ड्रगमाफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात ठेवण्यात आले होते. यावेळी नियुक्तीस असलेल्या २ पोलिसांनी बंदोबस्तात निष्काळजीपणा आणि त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी या पोलिसांना अटक करण्यात आली आहे.

नथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मेफेड्रोनची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी ललितच्या साथीदारासह ससून रुग्णालयाच्या उपहारगृहातील कामगाराला अटक केली. त्यांच्याकडून २ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.

(हेही वाचा – Lower Parel : लोअर परळ डिलाईल पुलाची दुसरी मार्गिका येत्या चार दिवसांमध्ये होणार सुरु )

या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीत दोषी आढळलेला एक साहाय्यक निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी ललितला पसार होण्यास मदत केल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलीस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.