Crime : परदेशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गेस्टहाऊसच्या कर्मचाऱ्याला २ वर्षाचा कारावास

साक्षीदार आणि पीडितेचे जबाब २४ तासांच्या आत नोंदवण्यात आले आणि आरोपींविरुद्ध तत्काळ आरोपपत्र दाखल करण्यात आले.

140
Crime : परदेशी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गेस्टहाऊसच्या कर्मचाऱ्याला २ वर्षाचा कारावास

मुंबईतील एका गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाला पेरू देशातील महिलेचा विनयभंग (Crime) केल्याप्रकरणी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तिच्या खोलीत प्रवेश करून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दोन महिन्यांत खटला पूर्ण करून न्यायालयाने देशाच्या प्रतिष्ठेचा हवाला देत आरोपीला कोणतीही सवलत देण्यास नकार देऊन २वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

(हेही वाचा – Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शाखाप्रमुखाची हत्या)

रियाझ अहमद, राजू अहमद (१९) भायखळा येथील वेलकम गेस्ट हाऊसमध्ये काम करत होता. “आरोपीने (Crime) महिलेसोबत सेल्फी घेण्यासाठी हॉटेलच्या खोलीत प्रवेश केला आणि तिच्या शरीराला अयोग्यरित्या स्पर्श केला. यानंतर तिने एका मैत्रिणीचा सल्ला घेतला आणि घटनेची माहिती आम्हाला दिली. तो त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही त्यालाअटक केली,” अशी माहिती भायखळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली.

हेही पहा – 

ते पुढे म्हणाले की, “साक्षीदार आणि पीडितेचे जबाब २४ तासांच्या आत नोंदवण्यात आले आणि आरोपींविरुद्ध तत्काळ आरोपपत्र दाखल करण्यात आले.” पीडित महिला आणि साक्षीदार यांना स्पॅनिश भाषेशिवाय दुसरी भाषा येत नसल्यामुळे आमच्या तपास पथकाला घटनांचा क्रम समजून घेण्यात आणि महिलेचा जबाब नोंदवण्यात अनेक समस्या आल्या. त्यामुळे आम्हाला त्यांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी दुभाषिक आणि गुगल ट्रान्सलेटरची मदत घ्यावी लागली असे खोत यांनी सांगितले. माझगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अवघ्या दोन महिन्यांत खटला पूर्ण केला आणि रियाझला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि ५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली ,” अशी माहिती खोत यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.