चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्राद्वारे नोंदणी करून विक्री केल्याप्रकरणी अमरावती येथील आरटीओच्या ३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ महिन्यांच्या सखोल तपासात हे रॅकेट उघड करून एकूण ९ जणांना अटक केली आहे. टोळीचा सूत्रधार हा वापराच्या बहाण्याने ताब्यात घेतलेल्या ट्रकची अमरावती, नागपूर व इतर ठिकाणी नोंदणी करून त्यांची विक्री करत होता. याप्रकरणी महाराष्ट्रात १०, तर हरियाणात ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Crime)
नोंदणीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कागदी घोडे नाचवून चोरीच्या वाहनांची नोंदणी करणे अमरावतीच्या आरटीओ अधिकाऱ्यांना भोवले आहे. गुन्हेगारांना साथ दिल्याप्रकरणी एका गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील (४३), मोटर निरीक्षक गणेश वरुठे (३५), व सहायक प्रादेशिक मोटर परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके (३५) अशी अटक करण्यात आलेल्या अमरावती येथील अधिकाऱ्यांची नावे आहेत.
(हेही वाचा – अर्ज भरून प्रचाराला सुरुवात ; Adv Ujjwal Nikam यांचे विरोधकांना थेट आव्हान )
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मोटर वाहन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथून चोरीचे दोन ट्रक पडकले होते. त्यांचे चेचीस नंबर खोटे असून या ट्रकची बनावट कागद्पत्राद्वारे नोंदणी झाल्याचे समोर आले होते. त्याद्वारे सूत्रधार जावेद शेख (४९) याच्या मुसक्या आवळून त्याचे ५ साथीदार व त्यांना मदत करणारे अमरावती येथील ३ आरटीओ अधिकारी यांना अटक केली आहे. महंमद अस्लम शेख (४९), शिवाजी गिरी (४८), अमित सिंग (३३), शेख रफिक शेख दिलावर मन्सुरी (४०), वरून जिभेकर (४१) अशी जावेदच्या सहकाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून साडेपाच कोटीचे २९ ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community