मुंबई शहरासह उपनगरात तसेच उपनगरीय लोकल ट्रेन मध्ये मोबाईल फोनची चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मोबाईल रिपेअरिंगच्या नावाखाली चोरीचे मोबाईल फोन विकत घेऊन हे मोबाईलचे ‘आयएमईआय’ बदलून नेपाळ आणि बांग्लादेशात विकले जात होते. गुन्हे शाखेने या टोळीच्या ५ जणांना अटक करून जवळपास १६० मोबाईल फोन, एक लॅपटॉप असा एकूण १५ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)
मुंबईत दररोज शेकडो मोबाईल फोनची चोरी होण्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल होतात. सर्वात जास्त मोबाईल फोन चोरीच्या घटना रेल्वे मध्ये होतात एकट्या मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दररोज ४० ते ४५ मोबाईल फोन चोरीचे गुन्हे दाखल होतात. यापैकी केवळ १० गुन्ह्याची उकल होऊन मोबाईल फोन हस्तगत करण्यात येतात. मोबाईल फोनचे पुढे काय होते याचे गुपित मुंबई गुन्हे शाखेने नुकत्याच केलेल्या कारवाईतून उघड केले आहे. (Crime)
(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : मुंबईत आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी अर्ज)
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पथकाने गोवंडी शिवाजी नगर मधून ५ मोबाईल रिपेअरिंग शॉपवर कारवाई करून पाच जणांना १६२ चोरीच्या मोबाईल सह अटक करण्यात आली आहे. या पाच जणांकडून १५ लाख ८८ हजार रुपयांचे आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन हे मुंबईतून चोरलेले मोबाईल फोन आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुंबईत चोरलेले मोबाईल फोन शिवाजी नगर येथील मोबाईल रिपेअरिंग दुकानदार विकत घेऊन त्याचे ‘आयएमईआय’ क्रमांक बदलून हे मोबाईल नेपाळ आणि बांग्लादेश येथे चोरट्या मार्गाने पाठवले जातात. नेपाळ आणि बांग्लादेश येथे चोरीच्या मोबाईलचे मोठे मार्केट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईतील शिवाजी नगर, मालवणी, ठाण्यातील मुंब्रा, भिवंडी येथे चोरीचे मोबाइल विकत घेणाऱ्या टोळ्या कार्यरत आहे. चोरीचे मोबाईल फोन परदेशात पाठवणारे मोठे सिंडिकेट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community