पश्चिम उपनगरातील मालाड येथील तपोवन आश्रमातील धुणी मंदिरात पहाटेच्या सुमारास पूजा सुरू असताना आश्रमातील ६७ वर्षीय मठाधिपती श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात मठाधिपती थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा हल्ला आश्रमातील एका माजी कर्मचाऱ्याने घडवून आणला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कुरार व्हिलेज पोलिसांनी माजी कर्मचाऱ्यासह दोन जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून माजी कर्मचाऱ्याचा शोध सुरू आहे. (Crime)
मालाड पूर्व येथील पठाण वाडी परिसरात संकट मोचन विजय हनुमान टेकडी या ठिकाणी तपोवन मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात गोशाळा, तसेच बाहेरून येणाऱ्या साधू, तपस्वीसाठी आश्रम बांधण्यात आलेला आहे. या मंदिराचे आणि आश्रमाचे श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालक दास महात्यागी, (६७) हे मठाधिपती आहेत. मंदिर व गौशाळेचा कारभार श्री गुरु श्री. महंत माधवाचार्य हे बघतात. (Crime)
गोशाळेची देखरेखीसाठी गौसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे. सूर्यनारायण दास हा गौसेवकाकडे गाईचे दूध काढण्याची आणि ते दूध आश्रमात पूजेसाठी ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सूर्यनारायण हा गाईचे दूध काढून त्यातील दूध चोरी करून परस्पर बाहेरील लोकांना विकत असल्याचा संशयावरून श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी, यांनी त्याला महिन्याभरापूर्वी कामावरून काढून टाकले होते. (Crime)
(हेही वाचा – ठाकरे पिता-पुत्रांना अडकवण्यासाठी Anil Deshmukh यांच्यावर फडणवीसांचा दबाव; Shyam Manav यांचे गंभीर आरोप)
सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय
मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी हे हनुमान मंदिर समोर उजवीकडे असलेल्या धुणी मंदिरात हवन करीत होते त्यावेळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मठाधिपती यांचा “बचाव बचाव” मार रहा है! इसको पकडो” असा ओरडण्याचा आवाज आल्याने सुरक्षा रक्षक दिपन रामरतन यादवने धुणी मंदिराकडे धाव घेतली. त्या दरम्यान एक अनोळखी इसम धुणी मंदिरातून धावत येताना दिसला, दीपक यादव याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने धक्काबुकी करून दीपक यादव याच्या तावडीतून स्वतःला सोडवून पळ काढला. सुरक्षा रक्षक दीपक यादवने मंदिराकडे धाव घेतली असता मठाधिपती श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ इतरांची मदत घेऊन जखमी श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. (Crime)
श्री गुरु श्री. महंत माधवाचार्यजी याच्या मानेवर, खांद्यावर तीक्ष्ण हत्याराचे वार होते. डॉक्टरांनी त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. कुरार व्हिलेज पोलिसांनी सुरक्षा रक्षक दीपक यादव याची फिर्याद नोंदवून संशयित आरोपी सूर्यनारायण दास आणि अनोळखी इसम असे दोन जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामावरून काढल्याच्या रागातून गौसेवक सूर्यनारायण दास याने मठाधिपती श्री गुरु श्री. महंत माधावचार्य यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या संशय कुरार व्हिलेज पोलिसांनी व्यक्त केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community