Crime: मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई, ४८ तासांत १४ तस्करींचा पर्दाफाश

यापैकी एका प्रकरणात तस्करांनी विमानाच्या सीटमध्येच सोने लपविल्याचे आढळून आले.

154
Manipur Police: भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७ जण मणिपूर पोलिसांच्या ताब्यात

गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या (customs department) अधिकाऱ्यांनी सोने तस्करीच्या १४ प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. या कारवायांमध्ये ३ कोटी ९२ लाख रुपयांचे ७ किलो २० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे तसेच ५ आयफोन-१५ देखील जप्त केले आहेत. १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान अधिकाऱ्यांनी ही कारवाई (Mumbai airport) (Crime) केली आहे.

यापैकी एका प्रकरणात तस्करांनी विमानाच्या सीटमध्येच सोने लपविल्याचे आढळून आले. अन्य एका प्रकरणात व्हॅक्यूम क्लीनरमध्ये सोने दडवून आणल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आहे. या १४ प्रकरणांमध्ये अटक केलेल्या आरोपीमध्ये काही भारतीय नागरिक तर काही परदेशी नागरिकांचा समावेश असून या प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – First Marathon 2024: अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहतूक नियंत्रण विभागाकडून अधिसूचना जारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.