-
प्रतिनिधी
होळीच्या पार्टीत टीव्ही अभिनेत्रीला रंगवून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार अंधेरी येथे घडली. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात एका टीव्ही कलाकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित टीव्ही अभिनेत्री ही सध्या अंधेरी येथील एका टेलिव्हिजन चॅनेलमध्ये अभिनेत्रीचे काम करीत आहे. (Crime)
(हेही वाचा – Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या मागणीसाठी आमदार टी राजा येणार कोल्हापुरात)
होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी टेलिव्हिजन चॅनेलने टेरेसवर रंगपंचमीच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी सर्व कलाकार आणि अभिनेत्रीला बोलविण्यात आले होते. पीडित अभिनेत्री ही या पार्टीत सामील झाली होती. तिच्यासोबत सह कलाकार देखील सामील झाले होते. पीडितेसोबत काम करणारा ३० वर्षांचा पुरुष कलाकार देखील या पार्टीत सामील झाला होता. (Crime)
(हेही वाचा – Amritsar मधील मंदिरावर ग्रेनेडने हल्ला; व्हिडिओ व्हायरल)
या पुरुष कलाकाराने मद्याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले होते. नशेतच त्याने पीडित अभिनेत्रीला पकडून त्याने तिच्या सर्वांगाला रंग, लावून तिचा विनयभंग करून तिला माझ्यासोबत लग्न कर नाही मी तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या अभिनेत्रीने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या पुरुष कलाकारविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community