वाढदिवसाचा केक आणण्यास उशीर झाल्यामुळे एका व्यक्तीने पत्नी व मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना साकीनाका येथे घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या आई आणि मुलाला राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साकीनाका पोलिसांनी पतीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Crime)
रंजना शिंदे (४०) आणि सुनील शिंदे (२२) असे हल्ल्यात जखमी झालेल्या आई आणि मुलाचे नाव आहे. साकीनाका सफेद पूल या ठिकाणी रंजना शिंदे पती राजेंद्र शिंदे आणि तीन मुलांसह राहण्यास आहे. राजेंद्र शिंदे (४५) हा वेल्डिंगचे काम करतो, तर रंजना ही घरकाम करते, मोठा मुलगा सुनील हा खाजगी नोकरी करतो. पती राजेंद्र शिंदे याचा वाढदिवस असल्यामुळे रंजना ही केक घेऊन घरी आली असता, पती राजेंद्र आणि मुले घरीच होते. केक आणायला उशीर का झाला म्हणून राजेंद्र याने पत्नी रंजनाला जाब विचारून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. (Crime)
(हेही वाचा – Loksabha Election 2024 : लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू; Devendra Fadnavis यांनी व्यक्त केल्या भावना)
वडील आईला मारहाण करीत असल्याचे बघून मोठा मुलगा सुनील हा तिच्या बचावासाठी पुढे आला असता राजेंद्र याने घरातील चाकूने पत्नी आणि मुलावर चाकूने हल्ला करून जखमी केले. शेजाऱ्यांनी राजेंद्रच्या तावडीतून सुटका करून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन रंजनाचा जबाब नोंदवून पत्नी राजेंद्र याच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community