प्रेयसीच्या घरात घुसून प्रियकराने तिच्यावर ब्लेडने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न (Crime) केल्याची घटना मंगळवारी दुपारी काळा चौकी परशुराम नगर येथे घडली. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
समीर राऊत (४४) असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव असून तो त्याच परिसरात राहण्यास आहे. वाहन चालक असणारा समीर राऊतचे परशुराम नगर मध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीसोबत मागील एक पासून प्रेमप्रकरण सुरू होते. समीर ने तीला लग्न करण्याची गळ घातली परंतु समीरला व्यवस्थित कामधंदा नसल्यामुळे तीने लग्नासाठी नकार देऊन त्याला भेटणे टाळले.
(हेही वाचा-Anita Bose Pfaff : सुभाष चंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस फाफ)
समीरने तिला अनेक वेळा भेटण्यासाठी बोलावून देखील ती येत नसल्यामुळे समीर संतापला होता. मंगळवारी सोक्षमोक्ष करण्याच्या इराद्याने समीर हा दुपारी तरुणीच्या घरी गेला, तरुणीला घरी एकटेच बघून त्याने तिच्या घरात प्रवेश करून तीला लग्न करण्यासाठी बळजबरी करू लागला परंतु तीने त्याला नकार देतात समीर ने सोबत आणलेल्या ब्लेड ने तरुणीच्या गळ्यावर चेहऱ्यावर व छातीवर वार करून तीला जखमी करून पळून गेला.
आरडाओरडा एकूण शेजारीपाजारी तरुणीच्या मदतीसाठी आले, ती रक्तबंबाळ अवस्थेत बघून तीला तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेवुन जखमी तरुणीचा जबाब नोंदवून समीर यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेऊन काही तासात त्याला अटक करण्यात आली अशी माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वपोनि. संजय मोहिते यांनी दिली.
Join Our WhatsApp Community