- मुंबई – संतोष वाघ/
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या फोटोचा गैरवापर करून कतारच्या प्रिन्स (राजकुमार) च्या सल्लागाराला मेसेज करून पैशांची मागणी करणाऱ्याला महाराष्ट्र सायबर सेलने जुहूतील एका व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे. राहुल कांत असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव असून त्याला आजारी आईवर उपचार करण्यासाठी पैशांची गरज होती, यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (Crime)
महाराष्ट्र सायबर सेलच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात प्रफुल्ल पटेल यांच्या खाजगी सचिवाने नोडल सायबर पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत असे म्हटले होते की, एका अज्ञात व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल याचा फोटो व्हॉट्सअॅपच्या डीपीला लावून पटेल यांच्या नावाने कतार मधील राजकुमार (प्रिन्स) च्या सल्लागाराला मेसेज पाठवून पैशांची मागणी करण्यात आली होती. (Crime)
(हेही वाचा – Dadar : गोल देवळासमोरील मलवाहिनीची दिवसातून तीन वेळा होणार सफाई)
परिस्थितीमुळे केले कृत्य
दरम्यान या सल्लागाराने काय प्रकार आहे, पटेल यांना पैशांची काय गरज भासली म्हणून खात्री करण्यासाठी फोन लावला असता पटेल यांनी असा कुठलाही मेसेज केलेला नसल्याचे समोर आले. प्रफुल पटेल यांच्या नावाने तसेच फोटोचा वापर करून कोणी तरी पैसे मागत असल्याची तक्रार नोडल सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. २० जुलै रोजी घडलेल्या या घटनेची तक्रार २३ जुलै रोजी करण्यात आली. महाराष्ट्र सायबर सेलच्या नोडल सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असता जुहू येथे राहणारा व्यवसायिक राहुल कांतला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता तो हॉटेल व्यवसायिक होता, परंतु कोरोना काळात त्याचा व्यवसाय बुडाला होता. त्यानंतर तो आर्थिक परिस्थितीने गांजला होता, त्यातच त्याच्या आईला दुर्धर आजार झाला. (Crime)
आईच्या उपचारासाठी त्याला पैशांची गरज असल्यामुळे त्याने एका वेबसाईटच्या माध्यमातून कतारच्या राजकुमारचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्याने मोबाईलचे नवीन सिम कार्ड घेऊन मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप सुरू करून त्याच्यावर प्रफुल पटेल यांचा फोटो लावून प्रफुल पटेल नावाने व्हॉट्सअॅप सुरू केले होते. व कतारच्या राजकुमारच्या मोबाईलवर मेसेज पाठवून पैशांची मागणी केली होती अशी माहिती समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या राहुल कांत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस महानिरीक्षक संजय सिंत्रे यांनी दिली. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community