दक्षिण मुंबईतील ग्रँटरोड, त्रिभुवन रोड वर असलेल्या ‘आर्यन ऑर्केस्ट्रा बार’मध्ये २५ जुलै रोजी मद्यप्राशनासाठी नियमित येणारा मोहम्मद सिद्दीकी हुसेन याने धार्मिक गाण्यावरून मॅनेजर अमरजित सिंग याच्यासोबत वाद घालून गाणे बंद करायला लावले होते. हे गाणे काही ग्राहकांच्या फर्माईशवरून सादर करण्यात आले होते, त्या गाण्याला मोहम्मद सिद्दिकी याने आक्षेप घेऊन गाणे बंद करायला लावले होते. त्यानंतर मोहम्मद सिद्दिकी (Crime) आणि त्याच्या साथीदाराने बारमध्ये शिवीगाळ करून करून बघून घेण्याची धमकी देऊन निघून गेला होता.
(हेही वाचा-Military Schools : छात्रसैनिकांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी सैनिकी शाळा कटीबद्ध)
रात्रीच्या सुमारास बारमध्ये सुरू असलेल्या राड्यामुळे ग्राहकामध्ये पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच डी. बी. मार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन राडा करणाऱ्यांची धरपकड करून काही जणांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले, जखमींना उपचारासाठी (Crime) जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या राड्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटावर खुनाचा प्रयत्न, दंगलीचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही गटातील चार जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.