स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या (Crime) कलमांचा केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्यांच्या साथीदारांवर भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुंडाचा केक कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यात आली. केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल करून स्थानिकामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या गुंडाने केला होता.
जियाउद्दीन अन्सारी (२७) असे या गुंडांचे नाव आहे. भांडुप पश्चिम गावदेवी परिसरात राहणारा जियाउद्दीन अन्सारी विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात २०१५ पासून ८ गंभीर गुन्ह्याची (Crime) नोंद आहे, त्यात भा.द.वि. कलम ३०२( हत्या), ३०७ (हत्येचा प्रयत्न), ३८७ (खंडणी) आणि ३२४ ( गंभीर दुखापत) या गुन्ह्याचा समावेश आहे. जिया अन्सारी हा काही आठवड्यापूर्वी तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता.
(हेही वाचा West Bengal चा होणार दुसरा काश्मीर; मुर्शिदाबादमधून हिंदूंचे सुरु झाले पलायन)
१२ एप्रिल रोजी त्याचा मोठा भाऊ फिरोज आणि साथीदारांनी त्याचा वाढदिवस साजरा केला होता, वाढदिवसासाठी सहकाऱ्यांनी त्याच्या वयाप्रमाणे २७ केक आणले होते, या केकवर ‘भांडुप किंग जिया’ असे लिहून उर्वरित केकवर त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याची (Crime) कलमे लिहण्यात आली होती आणि सर्वात शेवटच्या केक वर प्रश्नचिन्ह (पुढील गुन्हा) टाकण्यात आले होते. जिया हे केक कापताना त्याचा व्हिडीओ आणि फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्याच्या या व्हायरल व्हिडीओची चर्चा भांडुप परिसरात होताच लोकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. या व्हायरल व्हिडीओची दखल पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) विजयकांत सागर यांनी घेऊन तात्काळ त्याच्यावर गुन्हा (Crime) दाखल करून प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. भांडुप पोलिसांनी जियाउद्दीन अन्सारी, त्याचा मोठा भाऊ फिरोज अन्सारी आणि १० ते १२ त्याचे सहकारी असणाऱ्यावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community