Crime : घुसखोर बांगलादेशी महिलांसह ५ जणांना अटक; २५ वर्षांपासून होते बेकायदेशीर वास्तव्यास

196
Crime : घुसखोर बांगलादेशी महिलांसह ५ जणांना अटक; २५ वर्षांपासून होते बेकायदेशीर वास्तव्यास

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मागील २० ते २५ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या ४ महिला व १ पुरुष अशा ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या चारही बांगलादेशी नागरिकांनी भारतीय असल्याचा पुरावा असलेले आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून घेतल्याचे उघडकीस आहे. (Crime)

कोपरखैरणेमधील खैरणेगावात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरीत्या वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वपोनि. पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सपोनि. अलका पाटील व त्यांच्या पथकाने बोनकोडेमधील संशयित घरावर छापा मारला. यावेळी घरामध्ये ३ महिला व एक लहान मुलगी राहत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या महिलांकडे इतर ठिकाणी राहण्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबत चौकशी केली असता, त्यांनी जामा मशिदीच्या पाठीमागे असलेल्या शोएब पटेल बिल्डिंगमध्ये बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे सांगितले. (Crime)

(हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक पदकाचा रंग एका आठवड्यात उतरला! खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल?)

त्या ठिकाणी एक जोडपे त्यांच्या दोन मुलींसोबत राहत असल्याचे आढळून आले. चारही बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या वयाचा दाखला, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मूळ गावचा रहिवाशी दाखला याबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आढळून आले. मात्र, त्या सर्वांकडे भारतातील आधारकार्ड व पॅनकार्ड आढळून आले. त्यांच्याजवळ असलेले त्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड जप्त केली आहेत. या बांगलादेशी नागरिकांकडे असलेल्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, ते इमो अॅपचा तसेच व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडीओ कॉलद्वारे बांगलादेशातील आपल्या नातेवाईकांना संपर्क साधत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. या चारही बांगलादेशी नागरिकांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. (Crime)

या कारवाईत अटक करण्यात आलेली मायरा अस्लम मलिक (३५) ही १९९५ मध्ये तिच्या आत्यासोबत घुसखोरीच्या मार्गाने भारतात आल्याचे तसेच नसीमा बेगम बक्कम गाझी (४५) हिने २०१० मध्ये भारत-बांगलादेश सीमेवरील बेनापोल-बोनगा सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरीत्या प्रवेश केल्याचे त्यांच्या चौकशीत उघडकीस आलेआहे. तर फातिमा फजल्लू खान (४५) व फिरोजा शाहदत मुल्ला ऊर्फ फिरोजा अनीश शेख (३४) यांनी २००५ ते २०१० या कालावधी घुसखोरीच्या मार्गाने बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. तर अनीश असरुद्दीन शेख (३८) याने देखील २००५ ते २०१० या कालावधी त्याच्या बहिणीसोबत घुसखोरीच्या मार्गाने बांगलादेश सीमेवरून अवैधरीत्या भारतात प्रवेश केला आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.