खोपोलीच्या ढेकू गावातील अंचल केमिकल या फॅक्टरीवर (Crime) छापा घालून रायगड पोलिसांनी १०७ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केल्याच्या घटनेनंतर रायगड पोलिसांनी पुन्हा तब्बल २१८ कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. हा साठा अंचल केमिकल फॅक्टरीत तयार केला होता आणि होनाड गावातील एका गोदामात लपवून ठेवला होता.
याप्रकरणी आरोपींनी परदेशातही एमडी ड्रग्जचा पुरवठा केल्याची माहिती उघड झाली आहे. केमिकल तयार करणाऱ्या अंचल केमिकल कंपनीत नशेच्या एमडी पावडरची फॅक्टरी सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी अॅन्थोनी पाऊलोस करीकुट्टीकरन याच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांनाही खालापूरच्या प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
(हेही वाचा- NIA कडून २० संशयितांची चौकशी, कल्याणच्या तरुणाचा समावेश)
अॅन्थोनी करीकुट्टीकरन याची कसून चौकशी केली असता २१८ कोटींचा साठा बनवून होनाड गावातील एका गोदामातील ७ बॅरलमध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष काळसेकर, उपनिरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, पोलीस हवालदार सागर शेवते यांच्या पथकाने गोदामावर छापा मारून एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला.
हेही पहा –