मतिमंद मुलीला होणारा त्रास बघवत नसल्यामुळे आईने आणि आजीने तीला कायमची मुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील नौपाडा येथे घडली आहे. ठाण्यातील नौपाडा येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली असून नौपाडा पोलिसांनी आई आजीसह तीन जणां विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – MNS : ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” बसवली, तर वाहन चोऱ्या थांबणार का; मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र)
आरोपी स्नेहल पवार (Snehal Pawar) (३५) ही आजारी पती राजेश पवार (Rajesh Pawar),१७ वर्षाची मतिमंद मुलगी यशस्वी आणि आई सुरेखा महंगडे (Surekha Mahangade) (६०) सोबत ठाण्यातील शिवाजी पथ येथील जगताप चाळीत राहण्यास आहे, स्नेहल पवार (Snehal Pawar) यांचा मुलगा अहमदनगर येथे शिक्षण घेत असून तेथेच राहण्यास आहे. पती राजेश आजारी असल्यामुळे त्यांना चालता येत नाही, ते एकाच जागी अंथरुणावर खिळून असतात, १७ वर्षाची मुलगी ही लहानपणापासून मतिमंद असून तिला चालता बोलता येत नाही. यशस्वीला मागील काही दिवसापासून खूपच त्रास होत होता, रात्रभर ती ओरडत असायची, तिला होणारा त्रास आणि तिचे हाल आई स्नेहल पवार (Snehal Pawar) आणि आजीला बघवत नव्हते. (Crime)
(हेही वाचा – Russia-Ukraine War ची आग शमणार; संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव संमत)
अखेर दोघींनी मिळून यशस्विला कायमची मुक्ती देण्याचे ठरवले, १९ फेब्रुवारी रोजी आई आणि आजीने मुलगी यशस्वीला जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या दिल्या, यशस्वीचे शरीर संपूर्ण गार पडल्यानंतर या दोघीना मध्यरात्री दोघीना एका महिलेची मदत घेवुन यशस्वीचा मृतदेह चादरीत गुंडाळून एका मोटारीत टाकला आणि सातारा जिल्ह्यातील वाई येथे मृतदेहाची विल्हेवाट लावली. यशस्वीचा मृतदेह घरातून एका वाहनात टाकताना जगताप चाळीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हि कॅमेरात कैद झाला, आणि दोन दिवसानंतर हे सीसीटीव्ही फुटेज बळीत मुलीची आत्या वर्षा रघुनंदन यांच्या मोबाईल वर आला असता ह प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी (Naupada Police) आईसह तीन जणांविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community