मुस्लिम कुटुंबियांकडून हिंदू तरुणासह त्याच्या मुस्लिम पत्नीला ठार मारून (Crime) मृतदेह गोवंडी आणि नवीमुंबईतील कळंबोली या ठिकाणी फेकण्यात आला होता. मुलीने कुटुंबियांच्या मर्जीविरुद्ध हिंदू मुलासोबत विवाह केल्यामुळे संतापलेल्या वडिल आणि भाऊ यांच्यासह सहा जणांनी मिळून दोघांची हत्या केल्याची खळबळ उडवून देणारी घटना मुंबई पूर्व उपनगरातील गोवंडी येथे मंगळवारी उघडकीस आली आहे. गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी मुलीचे वडील, भाऊ नातलगासह ६जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ६ जनांपैकी तिघेजण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडवून दिली असून हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
करण रमेशचंद्र चौरसिया (२२) आणि गुलजार (२०) असे हत्या करण्यात आलेल्या नव विवाहित जोडप्याचे नावे आहेत.उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात राहणारे करण आणि गुलजार खान यांच्यात प्रेम होते, परंतु मुलीच्या कुटूंबियाकडून या दोघांच्या प्रेमाला विरोध होता. कुटुंबीयांचा विरोध धुडकारून या दोघांनी कुटुंबियांच्या मर्जी विरोधात जाऊन मागील वर्षी पळून जाऊन लग्न केले होते. व त्यानंतर दोघेही नवीदिल्ली येथे राहत होते. मुलीने आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे मुलीचे वडील गोरा खान (५०) आणि तिचा भाऊ सलमान हे दोघे संतापले होते.
(हेही वाचा-Beauty Tips: उन्हामुळे चेहरा टॅन झालाय ? ‘या’ टिप्स वापरा, चेहरा होईल तजेलदार आणि आकर्षक)
गुलजार हिचा भाऊ सलमान हा धारावीत राहण्यास होता, काही महिन्यांपूर्वी गोरा खान पत्नीसोबत धारावी येथे मुलाकडे राहण्यास आले होते, मुलीने केलेल्या विवाहामुळे गोरा खान आणि सलमान दोघेही संतापले होते. मुलीला आणि तिच्या पतीला आयुष्याची अद्दल घडविण्याची योजना वडील आणि भावाने आखली होती. सलमान याने नातेवाईक मोहम्मद कैफ नौशाद खान याची मदत घेतली तसेच त्याच्या ओळखीच्या शिवाजी नगर गोवंडी येथे राहणाऱ्याची मदत घेतली. मुलगी गुलजार आणि तिचा पती करण जयस्वाल याला ठार करण्याचा कट या सहा जणांनी मिळून रचला होता. (Crime)
ठरलेल्या योजने प्रमाणे गोरा खान याने दिल्ली येथे राहणाऱ्या मुलीला आणि जावयाला मुंबई धारावी येथे बोलावून घेतले. १३ सप्टेंबर रोजी करण याला मुंबई फिरण्याच्या निमित्ताने सलमान आणि इतर पाच जण गोवंडी येथे घेऊन आले, गोवंडी रेल्वे रुळाजवळील झाडीत करन याच्यावर चाकूने वार करून हत्या केली, त्यानंतर त्याचा मृतदेह बंद असलेल्या टेलिकॉम फक्ट्रीत असलेल्या विहिरीत फेकला. दुसरीकडे गोरा खान याने मुलीला सोबत घेऊन कळंबोली येथे घेऊन आले व मुलीची हत्या करून तीचा चेहरा दगडाने ठेचून मृतदेह कळंबोली येथील निर्जन ठिकाणी झाडीत फेकून दिला.
गोवंडी पोलिसांना १४ सप्टेंबर रोजी करनचा मृतदेह मिळून आला, तांत्रिक तपासावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून करण याचे सासरे याला धारावीतून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत मुलीचा मृतदेह फेकण्यात आलेली जागा पोलिसांना दाखवली. गोवंडी पोलिसांनी गुलजारचा मृतदेह ताब्यात घेऊन या हत्याकांड प्रकरणी मुलीचे वडील, भाऊ यांच्यासह सहा जणांविरुद्ध हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड म्हणजे ऑनर किलिंगचा प्रकार असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community