Crime News : नाकाबंदीत कसारा घटाच्या पायथ्याशी सापडले 2 कोटीचे घबाड

79
Crime News : नाकाबंदीत कसारा घटाच्या पायथ्याशी सापडले 2 कोटीचे घबाड
Crime News : नाकाबंदीत कसारा घटाच्या पायथ्याशी सापडले 2 कोटीचे घबाड

मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai-Nashik Highway) कसारा घाटातील (Kasara Ghat) चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. पोलिसांनी बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी नाकाबंदी दरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारी  एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८  या  गाडीत २ कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे. (Crime News)

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलीस चौकीजवळ (Chintaman Police Station) स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत रोख रक्कम आढळून आली आहे. या गाडीत अंदाजे २ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम पोलिसांनी जप्त केली असून वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव व  निवडणूक भरारी पथक व टीमकडून पुढील तपास सुरु आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly 2024 : विधानसभेसाठी भाजपाचा जोरदार प्रचार; पंतप्रधान मोदींच्या 8, गडकरींच्या 40, योगींच्या 15 सभा…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात तपासणीदरम्यान ५ कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. त्यानंतर आता शहापूर तालुक्यात २ कोटी रुपयांची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली असून ही रक्कम नक्की कोणाची आहे, याबाबत अधिक तपास केला जात आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.