महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभुमीवर भरारी पथकाकडून तपास मोहिम राबवली जात आहे. याचाच फायदा काही भामट्यांनी घेतला आहे. बनावट निवडणूक पथक बनवून वाहन तपासणीच्या नावाखाली एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांचा गंडा (Crime News) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर येथे हा प्रकार घडला असून व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेतली आहे.
(हेही वाचा-Uddhav Thackeray यांच्या बॅग तपासणीला BJP चं प्रत्त्युत्तर; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर)
कोल्हापूरात काही भामट्यांनी या तपासणी पथकाची हुबेहुब नक्कल करून कोल्हापूरात एका व्यापाऱ्याला 25 लाख रुपयांचा गंडा घातला. पुणे-बंगळुरू महामार्गालगत तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. सुभाष हारणे असे फसवणूक झालेल्या व्यापाराचे नाव आहे. (Crime News)
नेमकं काय घडलं?
सुभाष हारणे हे यात्रेमध्ये पाळणा लावण्याचे काम करतात. ते सोमवारी 25 लाख रुपये घेऊन कारने हॉटेल तावडे येथे आले असता अज्ञात पाच जणांनी त्यांची कार अडवली. निवडणूक असल्यामुळे वाहनांची तपासणी सुरू असल्याचे सांगत हारणे यांच्या कारची तपासणी करण्याचे नाटक केले. या तपासणी दरम्यान 25 लाखांची रक्कत भामट्यांच्या हाती लागली. त्यानंतर भामट्यांनी हारणे यांना त्यांच्या कारमध्ये बसवले. या भामट्यांनी तपासणीची निवडूक पथकाप्रमाणे हुबेहूब नक्कल केल्यामुळे व्यापाऱ्यालाही संशय आला नाही. थोडे पुढे गेल्यानंतर हारणे यांचा मोबाईल आणि रक्कम घेऊन भामटे पसार झाले. घडलेल्या प्रकारानंतर सुभाष हारणे यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. (Crime News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community