जोगेश्वरीतून ६ तलवारी जप्त; एकाला अटक

208
पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील गुलशन नगरमधील एका घरातून ६ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी एका सराईत गुंडाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
जोगेश्वरी पश्चिम राम मंदिर रोडवरील गुलशन नगर येथील घरात शस्त्रसाठा दडवून ठेवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ला मिळाली. या महितीच्या आधारे कक्ष ९ च्या पथकाने मंगळवारी रात्री गुलशन नगर येथील एका घरात छापा टाकला. या छापेमारी दरम्यान पोलिसांना ६ तलवारी सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी सय्यद मजिद आलम उर्फ विकी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. या चौकशीदरम्यान,  त्याने या तलवारी बेकायदेशीररित्या घरात लपवून ठेवल्याचे समोर आले आहे.
अधिक तपास सुरु
गुन्हे शाखेने या प्रकरणी ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सय्यद मजिद आलम उर्फ विकी याला अटक केली आहे. सय्यद याच्याविरूद्ध ५ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्याने या तलवारी कशासाठी आणल्या होत्या याबाबत तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.