Crime News : गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू

44
Crime News : गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू
Crime News : गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू

गोदावरी (Godavari) काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी (Crime News) , नदी काठावरील शेतकऱ्यांनी अवैधरित्या आपली शेतजमीन वाळूचा (sand seizure) अनधिकृत साठा साठवण्यासाठी तसेच बिहारीला वास्तव्य करण्यासाठी भाड्याने जमीन देऊन वाळू तस्करांना मदत केली आहे. या सर्वांची महसूल खात्याने गंभीर दखल घेतली आहे. गोदावरी नदीकाठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू आहे. वाळू तस्करावर एमपीडीए 1981 नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने (Revenue Division) दिली आहे. (Crime News)

हेही वाचा-Chhattisgarh मधील विजापूर-नारायणपूर सीमेवर चकमक, जवानांनी १२ नक्षलवाद्यांना केले ठार ; शस्त्रे जप्त

महसूल खात्याच्या पथकाने तीन मोठे इंजिन जप्त करून संबंधितावर लिमगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2025 अन्वये दाखल केला आहे. नदीकाठावरील भनगी, वाहेगाव, गंगावेट, विष्णुपुरी, थूगाव, कल्याळ, लोहा तालुक्यातील बेट सांगवी, इत्यादी गावांमधील अवैध वाळू साठा मागच्या तीन दिवसापासून जप्त करून पुढील कारवाई सुरू आहे. (Crime News)

हेही वाचा-SSC & HSC Board Exam : दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

आज पर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त केली आहे. हे काम अजून पुढे दोन-तीन दिवस चालणार आहे. यापुढे सुद्धा ही अविरत कार्यवाही सुरू राहणार आहे. या कारवाईनंतर (Crime News) वाळू तस्करानी गोदावरी नदीमध्ये तराफे, इंजिन टाकून वाळू उपसा केल्यास, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन वाळू उपसा करणारे बिहारी मजूर यांना अनधिकृतपणे झोपड्या टाकण्यासाठी दिल्यास अथवा अनधिकृतपणे अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा यांना शेतकऱ्यांनी अनधिकृत रस्ता दिल्यास अथवा वाळू तस्करांना बेकायदेशीररित्या मदत करणाऱ्या व्यक्तीवर, संबंधितावर MPDA 1981 नुसार गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे इशारा देण्यात आला आहे. (Crime News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.