Crime News : अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब स्फोट की आणखी काही? तुरुंगात एकच खळबळ

131
Crime News : अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब स्फोट की आणखी काही? तुरुंगात एकच खळबळ
Crime News : अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब स्फोट की आणखी काही? तुरुंगात एकच खळबळ

अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या (Amravati Central Jail) हद्दीत येणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी रात्री उशिरा दोन दारुगोळे (Crime News) आढळले. यातील एका गोळ्याचा स्फोट झाला. त्यामुळे मोठा आवाज झाला. यामुळे कारागृह प्रशासन व कैद्यांची एकच तारांबळ उडाली. संपूर्ण कारागृहात दहशत पसरली आहे. (Crime News)

बॉम्बनाशक पथक, बॉम्बशोधक पथक दाखल

रात्री उशिरा अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अचानक एक मोठा स्फोट झाला. यामुळे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. हायवेला लागून असलेल्या भिंतीकडून दोन दारुगोळे आल्याचा संशय पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त केला. फुटलेल्या गोळ्याचे अवशेष जमा करून घटनास्थळी बॉम्बनाशक पथक, बॉम्बशोधक पथक दाखल झाले होते. बॉम्ब नाशक पथकाने दुसरा गोळा हस्तगत करत तो निकामी केला. या गोळ्यांमध्ये स्फोटकांमध्ये वापरण्यात येणारी दारु असल्याचे समोर आले आहे. (Crime News)

कारागृहात सुमारे १ हजार १०० पेक्षा अधिक कैदी

फ्रिजरपुरा परिसरात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुमारे १ हजार १०० पेक्षा अधिक कैदी आहेत. यातील काहींना जन्मठेप झाली आहे, तर काही जणांच्या विरोधात खटले सुरु आहेत. अशा कैद्यांची संख्या मोठी आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक येथीलही कैदीसुद्धा आणण्यात आले आहेत. (Crime News)

यासंदर्भात माहिती देताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, पोलीस प्रशासनाच्या वतीने घटनेची सखोल चौकशी करणे सुरू आहे. अशा प्रकारचे गोळे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र हे कुणी व कशासाठी फेकले यासंदर्भात चौकशी सुरु आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.