साताऱ्यातील पाटणमधील सोनवडे (Crime News) या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने सोनावडे या सरकारी रुग्णालयात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. यावेळी त्या महिलेने त्रास होतोय हे सांगत असतानाही डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयीपणे अनेक तास त्यांचे ऑपरेशन केले. त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. पण डॉक्टरांनी सलाईनमधून पेनकिलर देऊन त्यांना डिस्चार्ज दिला. यानंतर पुन्हा हाच प्रकार घडला.
ऑक्सिजन लेव्हलही कमी
यानंतर त्यांना पाटणमध्ये त्यांना सोनोग्राफीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांचे पोट फुगले होते. त्यावेळी कराड येथील कॉटेज कुटीर रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्यांनीही केवळ पेनकिलर दिले. आता त्यांना कशाचाच फरक पडत नव्हता. असह्य वेदना होत होत्या. त्यांचं ऑक्सिजन लेव्हलही कमी झाले होते. यानंतर त्यांनी साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. पण हे कुणीही सोनोग्राफी करत नसल्याचे समजताच कुटुंबाने एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. (Crime News)
ऑपरेशन चुकीचे झाले म्हणून…
त्यांच्यावर भारती रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. यादरम्यान त्यांना माझ्यासोबत काही तरी चुकीच घडलंय, याची जाणीव झाली होती. त्यानंतर त्यांच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या पोटात आताड्याला भोक पडून सगळीकडे इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे किडनी आणि लिव्हर ला मोठे इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी डॉक्टरांनी कुटुंबं नियोजन ऑपरेशन चुकीचे झाले म्हणून तिच्या पोटातली ट्यूब काढून टाकली. त्यानंतर सुद्धा तिचा त्रास थांबलेला नाही. डॉक्टरांनी तीन महिन्याने पुन्हा दुसरे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे. (Crime News)
संबंधित घटना अत्यंत चुकीची आणि एका व्यक्तीचं आयुष्यच नाही तर संपुर्ण कुटूंब उध्वस्त करणारी आहे.राज्य महिला आयोगाने संबंधित घटनेची दखल घेतली असून सकाळपासूनच तपासकार्याला सुरूवात केलेली आहे,यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल. https://t.co/h03fgCRogO
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 6, 2024
याप्रकरणी सोनवडे सरकारी रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. अखेर याप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रुपाली चाकणकर यांनी नुकतंच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी संबंधित प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. “संबंधित घटना अत्यंत चुकीची आणि एका व्यक्तीचं आयुष्यच नाही तर संपुर्ण कुटूंब उध्वस्त करणारी आहे. राज्य महिला आयोगाने संबंधित घटनेची दखल घेतली असून सकाळपासूनच तपासकार्याला सुरूवात केलेली आहे, यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल.” असे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. (Crime News)
या घटनेनंतर सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते त्या रुग्णालयाविरोधात उपोषण करत आहेत. यानंतर सोनावडे या सरकारी रुग्णालयातून एका व्यक्तीचे निलंबन करण्यात आले. तर इतर दोन जणांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून आरोपींना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच या महिलेवर मोठ्या रुग्णालयात उपचार करुन तिचा जीव वाचवावा. तसेच पीडित कुटुंबंला शासकीय 25 लाख रुपये शासकीय मदत द्यावी, अशीही मागणी केली जात आहे. (Crime News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community