कृष्णा नदीच्या काठावर काही जण जुगार खेळत (Crime News) असताना पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांना घाबरून काही तरूणांनी पळ काढला. पण पळ काढताना गोलाकार बोटीत बसून जाणारे सहा जण बुडून मृत्यू पावले तर दोघे जण पोहून आल्याने वाचले. विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुने बळोती येथे ही घटना घडली.
(हेही वाचा –Indian Railway ने जून महिन्यात गाठला १३५.४६ मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा)
जुगार खेळत असताना पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने आठ जणांनी गोलाकार बोटीतून पळ काढला. पण नदी भोवऱ्यात सापडल्याने बोट कलंडली आणि सहा जणांना नदीत बुडून आपला जीव गमावला लागला. कोल्हार शहरातील रहिवासी महबूब वालीकार वय 30, तयब चौधरी वय 42, रफिक जालगार उर्फ बांदे वय 55, पुंडलिक मल्लाप्पा यंकंची वय 36, दशरथ गौडर सूळीभावी वय 66 असे मयत झालेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहेत. तर आणखीन एका मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. (Crime News)
(हेही वाचा –CM Majhi Ladki Bahin Yojna : दलाल खपवून घेतले जाणार नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा)
तसेच या बोटीतील सचिन कटबर व बशीर होनवाड त्या दोघांना पोहता येत असल्याने पोहत नदीकाठावर सुरक्षितपणे पोचल्याने या दोघांचा जीव वाचला आहे. अग्निशमन दल व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. यावेळी कुटुंबाने हंबरडा फोडला. रात्र झाल्याने मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अडचणी आल्या. यावेळी जमलेल्या जमावाकडून अनुचित प्रकार घडविण्यासाठी कोल्हार पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेची माहिती मिळताच साखर मंत्री व बसवन बागेवाडीचे आमदार शिवानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. (Crime News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community