छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एसबीआय बँकेचे एटीएम (ATM) गॅस कटरने फोडल्याची (Crime News) घटना समोर आली आहे. दोन चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे एटीएमला आग लागून जवळपास 13 ते 15 लाख जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा –Accident Mumbai Pune Expressway : वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू)
मशिनचा समोरचा भाग कापला गेला. परंतु एटीएम मशिनचा आतील भाग तसाच असल्याने गॅस कटरची नळी फिरली आणि त्यात गॅस कटरची ठिणगी पडली. त्यामुळे एटीएममधील जवळपास 13 ते 15 लाख रुपयांची रक्कम जळून खाक झाली. यानंतर बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. काही वेळात तेथील सायरन वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे बँकेच्या आसपास राहणारे काही ग्रामस्थ घराबाहेर निघाले. ही बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी गॅस कटर मशिन व अन्य साहित्य तेथेच टाकून पळ काढला. (Crime News)
(हेही वाचा –IAS Pooja Khedekar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण आता थेट पीएमओकडे!)
चोरट्यांनी एटीएममधील एक सीसीटीव्ही कॅमेरा तोडला तो बंद होता. त्याच्या बाजूला दुसरा डिजिटल कॅमेरा होता, त्या कॅमेऱ्यात ही घटना चित्रीत झाली आहे. पोलिस तपासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Crime News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community