बंगळुरू येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान पद्मावती या महिला रुग्णाच्या पाठीच्या कण्यामध्ये सुई सोडली. त्यामुळे महिलेला पोट आणि पाठदुखीचा त्रास सुरू झाला. सुमारे 6 वर्षांनंतर, जेव्हा पद्मावतीवर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली तेव्हा तिच्या पाठीच्या कण्यामधून एक सुई बाहेर आली. प्रकरण 2004 चे आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आता कर्नाटक ग्राहक मंचाने रुग्णालय आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या दोन डॉक्टरांना महिलेला ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. (Crime News)
(हेही वाचा –Mulund Hit And Run: मुंबईत पुन्हा भरधाव ऑडीने २ रिक्षांना उडवलं, अपघातानंतर चालक फरार)
29 सप्टेंबर 2004 रोजी, 46 वर्षीय पद्मावती यांच्यावर दीपक हॉस्पिटलमध्ये हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्यानंतरही त्यांना पोटदुखी, पाठदुखी आणि आघाताचा सामना करावा लागला. या काळात तिला दोनदा रुग्णालयात दाखलही करण्यात आले. 2010 मध्ये तपासादरम्यान, त्यांच्या मणक्यामध्ये 3.2 सेमी सर्जिकल सुई सोडल्याचे आढळून आले. (Crime News)
(हेही वाचा –Tata Motors ने भारतातील पहिल्या एसयूव्ही कूपेसह मिड-एसयूव्ही श्रेणीला नेले नव्या उंचीवर)
पुढच्या वर्षी पद्मावतीने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. मात्र, त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांची तक्रार बनावट असल्याचे म्हटले होते. 7 वर्षे उशिरा तक्रार दाखल करण्यावरही प्रश्न उपस्थित केले. आता या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल दीपक हॉस्पिटल आणि डॉ. शिवकुमार आणि डॉ. एचएन नागराज यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने रुग्णालय आणि दोन डॉक्टरांना खटल्याचा खर्च म्हणून पद्मावतीला 50,000 रुपये देण्यास सांगितले आहे. हॉस्पिटलमधील निष्काळजीपणाच्या जोखमीसाठी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला 5 लाख रुपयांची भरपाई द्यावी लागेल. (Crime News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community