जनावरांचे अपहरण करून त्यांचे मांस बेकायदेशीर रित्या विक्री करणाऱ्या कासमअली कुरेशी याला मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कासमअली याच्यावर ठाणे आणि पालघर जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात जनावरांचे अपहरण करून त्यांचे मांस बेकायदेशीर विक्रीचे ७ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहे. (Crime News)
(हेही वाचा- PM मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या SPG मध्ये लष्कराच्या जवानांचा समावेश का केला जात नाही?)
कासमअली कुरेशी (५३) हा मीरा रोड पूर्व येथील काशीगाव काशीमीरा येथे राहण्यास आहे. कासमअली हा गाय, बैल, रेडा, म्हेश सारख्या जनावरांचे अपहरण करून त्यांचे मांस बेकायदेशीर विक्री करण्याची टोळी चालवत होता. ठाणे जिल्हा, पालघर आणि मुंबई उपनगरात या टोळ्या रात्रीच्या वेळी तसेच दिवसा एक टेम्पो घेऊन फिरतात आणि रस्त्यावर मोकाट फिरणारे, तसेच गोटा तबेल्यात असणाऱ्या जनावरांचे अपहरण करून त्यांची कत्तल करून त्यांचे मांस बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा गोरखधंदा ही टोळी करीत होती.या टोळीचा म्होरक्या कासमअली कुरेशी हा असून त्याच्यावर, ठाणे पालघर जिल्ह्यात ७ पेक्षा अधिक गुन्ह्याची नोंद आहे. कासमअली याला अनेक वेळा अटक होऊन देखील त्याने त्याचा बेकायदेशीर धंदा बंद केलेला नाही. (Crime News)
कासमअली हा तुरुंगात असताना त्याची टोळी कासमअलीच्या इशाऱ्यावर हा बेकायदेशीर धंदा चालवत होती असे एका पोलीस अधिकारी यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी कासमअली यांच्यावर दाखल असलेल्या गोमांस विक्रीच्या गुन्ह्यामुळे मिरारोड परिसरात तणाव निर्माण झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अखेर कासमअली कुरेशी याच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. कासमअली याला मीरा भायदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून कासमअली याला ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime News)
हेही पहा-