Crime News : मुलीनं केला आंतरजातीय विवाह, राग अनावर झाल्याने वडील अन् मेहुण्याकडून जावयाची हत्या

189
Crime News : मुलीनं केला आंतरजातीय विवाह, राग अनावर झाल्याने वडील अन् मेहुण्याकडून जावयाची हत्या
Crime News : मुलीनं केला आंतरजातीय विवाह, राग अनावर झाल्याने वडील अन् मेहुण्याकडून जावयाची हत्या

आंतरजातीय विवाह केल्याने एका तरुणाची हत्या (Crime News) करण्यात आली आहे. आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबाला राग अनावर झाला. त्यामुळे मुलीच्या वडील आणि चुलत भावाकडून जावयाची हत्या करण्यात आली आहे. प्रेमविवाह‎ केल्याच्या रागातून सासरा आणि चुलत मेहुण्याने‎ जावयाला भररस्त्यावर चाकूने‎ भोसकले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

(हेही वाचा –Mumbai Local Megablock: घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!)

गीताराम भास्करराव कीर्तिशाही आणि अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही अशी आरोपींची नावे आहेत. तर अमित मुरलीधर ‎साळुंके असे मृत तरुणाचे नाव आहे. 14 जुलैला रात्री‎ शहरातील गारखेडा भागात ही घडली‎ होती. मात्र या तरुणावर उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी 25 जुलै रोजी या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (Crime News)

आरोपींनी अमितवर चाकू हल्ला ‎केला. त्याच्या पोटात, मांडीवर व ‎हातावर चाकूने वार केले. तो‎ रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर ते‎ पळून गेले. तेव्हा आरडाओरड ‎ऐकून मुरलीधर व दुसरा मुलगा‎ सुमीत हे तिकडे धावले. त्यांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अमितला उचलून घाटी रुग्णालयात‎ दाखल केले. तेथे अमितने‎ हल्लेखोर सासरा आणि चुलत ‎मेहुण्याचे नाव सांगितले. अमित वर‎घाटी रुग्णालयात उपचार सुरू‎ असताना गुरुवारी त्याचा मृत्यू‎ झाला.‎ (Crime News)

(हेही वाचा –कावड यात्रा मार्गावरील दुकानदारांच्या नामफलकाच्या वादानंतर Halal प्रकरण पोहचले सर्वोच्च न्यायालयात )

हे लग्न पार पडल्यानंतर‎ गीताराम कीर्तिशाही व अप्पासाहेब ‎‎कीर्तिशाही यांनी मुरलीधर यांची भेट ‎‎घेऊन अमित आणि त्याच्या पत्नीला ‎‎इंदिरानगरमध्ये राहू देऊ नका. जर ते ‎‎येथे दिसले तर त्यांच्या जिवाचे‎ बरेवाईट करू, अशी धमकी दिली ‎‎होती.‎ खरे तर मृत अमित आणि त्याची पत्नी बालपणीचे मित्र होते. अमितचे तिच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबीयांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. पण, घरच्यांचा विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. पुढे अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. तर, याउलट मुलीचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.