नवी मुंबईत महिला बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार; कारने जाताना वाटेत अडवले

70

नवी मुंबई बबंईपाडा येथे एका महिला व्यवसायिकावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० वर्षीय बिल्डर महिलेवर गोळीबार झाल्याने संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. स्नेहल पाटील असे महिलेचे नाव असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नेरूळमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा : MPSC चा अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करा! औरंगाबाद खंडपीठात याचिका )

स्नेहल पाटील यांच्यावर पनवेलवरून उरणला जाताना रात्रीच्या वेळेस हा गोळीबार करण्यात आला. स्नेहल पाटील आपल्या मावस भावासह घराकडे जात असताना गव्हाण फाटा येथे अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. यावेळी त्यांच्या पायाला गोळी लागल्याने स्नेहल यांना दुखापत झाली आहे. मंगळवारी नेरुळ येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्याचवेळी महिलेवर गोळीबार झाल्याची घटना घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आरोपींचा शोध सुरू 

दरम्यान हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.