नागपूर येथील रहिवासी असलेली पूजा राजनी (Pooja Rajni) ही सावंगी मेघे येथे एमबीबीएसचं (MBBS) शिक्षण पूर्ण करत होती. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू होणार होत्या. ती हॉल तिकीट मिळवण्यासाठी प्रशासकीय कार्यालयात गेली होती. शुक्रवारी पॅथॉलॉजी वन हा पेपर होता. पण महाविद्यालयात 75 टक्के हजेरी नसल्यानं तिला परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आलं. तिच्यासोबतच इतर 45 विद्यार्थी होते, ज्यांची 75 टक्के हजेरी नव्हती. 45 विद्यार्थ्यांनाही परीक्षेसाठी प्रतिबंध करण्यात आला होता. (Crime News)
(हेही वाचा –Jammu and Kashmir मध्ये पाकिस्तानी घुसखोर ठार, शस्त्रे जप्त)
सकाळी पूजानं नेहमीप्रमाणे पहिलं लेक्चर अटेंड केलं. त्यानंतर ती लायब्ररीमध्ये गेली. काही वेळानंतर लायब्ररीच्यावर असलेल्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन तिनं तिसऱ्या माळ्यावरून थेट खाली उडी घेतली. या धक्कादायक घटनेनं कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेच्या काही वेळापूर्वी पूजानं आपल्या आई आणि वडिलांना फोन केला होता. फोन करून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याची माहिती तिनं फोनवरून त्यांना दिली असल्याचं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे. (Crime News)
(हेही वाचा –घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये! CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंना टोला)
घटनेनंतर महाविद्यालयाकडून तात्काळ पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. सकाळी मोबाईलवर स्नॅपचाटवर ‘आय क्विट’ असा मेसेज करून पूजानं इशारा दिला असल्याची बाब समोर आली आहे. अभ्यासात हुशार आणि सातत्यानं मित्र मैत्रिणींशी गप्पा करणारी पूजा आत्महत्या करू शकते, अशी कल्पनाही करू शकत नसल्याची खंत तिच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. पुजाचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं म्हटलं आहे. (Crime News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community