Crime News : नवीमुंबईत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन, १६ आफ्रिकन नागरिकांना १२ कोटींच्या ड्रग्ससह अटक

147
नवीमुंबई पोलिसांनी शहरात राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान १६ आफ्रिकन नागरिकांना १२ कोटींच्या अमली पदार्थासह अटक केली आहे. या आफ्रिकन नागरिकांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दुपारी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये कोकेन आणि मफेड्रोन(एमडी) चा समावेश आहे. (Crime News)
नवीमुंबई शहरातील खारघर, कळंबोली, तळोजा, उलवे आणि वाशी नोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आफ्रिकन नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याच्या तक्रारी नवी मुंबई पोलीस आयुक्तलयात प्राप्त झाल्या होत्या, हे आफ्रिकन या ठिकाणी झुंडीने राहून बेकायदेशीर व्यवसाय करीत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. दरम्यान नवीमुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली १५० पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे विविध पथके तयार करण्यात करून गुरुवारी रात्रीपासून खारघर, कळंबोली, तळोजा, उलवे आणि वाशी नोड या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. (Crime News)
या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी २५ ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीर राहणाऱ्या ७६ आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून या छापेमारीत पोलिसांना १६ आफ्रिकन नागरिकांकडे चरस, गांजा, कोकेन,एमडी, मिथिलीन असे एकूण १२ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आफ्रिकन नागरिकांपैकी १६ जणांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तसेच उर्वरित आफ्रिकन नागरिकांचे व्हिसाची कालावधी संपल्यानंतर देखील हे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत होते. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर वास्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना भारतातून बाहेर जाण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नवीमुंबई पोलिसांचे हे कोंबिंग ऑपरेशन गुरुवारी रात्री सुरू करण्यात आले व शुक्रवारी रात्री हे ऑपरेशन सुरू होते. (Crime News)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.