पुण्यात पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन गोळीबार; तरुण गंभीर जखमी

137

पुण्यातील महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात हा तरुण गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

तरुणाची प्रकृती चिंताजनक

शेखर शिंदे नावाचा हा तरुण रात्री 9 वाजता रामेश्वर चौकातून जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांनी पिस्तुलातून गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या शेखर शिंदेला तातडीने रुग्णालयात दाखल केले, असून पुढील तपास सुरु आहे.

पुण्यात गोळीबारीच्या घटना सुरुच

काही दिवसांपूर्वी वारजे इथल्या रामनगरमधील वेताळबाबा चौकात गाळीबाराची घटना घडली होती. कार्तिक इंगवले नावाच्या आरोपीने दारुच्या नशेत असताना गोळीबार केला. कार्तिक इंगवलेचा मित्र वेताळबाबा चौकामधून चालला होता. त्यावेळी कार्तिकने त्या मित्राकडून 500 रुपये मागितले होते. त्याने पैसे नाही दिले म्हणून कार्तिक इंगवलेने त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने गोळी तरुणाला लागली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.