Crime News : चोरीच्या बाईक्सला जीपीएस लावून विकायचे; पुन्हा तीच बाईक चोरी करून तिसऱ्याला विकायचे

168
Crime News : चोरीच्या बाईक्सला जीपीएस लावून विकायचे; पुन्हा तीच बाईक चोरी करून तिसऱ्याला विकायचे
‘केटीएम’ ही महागडी बाईक्स चोरी करून बोगस कागदपत्रे तयार करून ‘ओएलएक्स’ विकायचे, त्यानंतर जीपीएसच्या माध्यमातून त्या बाईक्सचा शोध घेऊन पुन्हा तीच बाईक्स चोरी तिसऱ्या विकणाऱ्या दुकलीला अँटॉप हिल पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे. मोहम्मद सदाफ (Mohammad Shadab), मोहम्मद नाझिर अन्सारी (Mohammad Nazir Ansari) (२७) आणि मोहमद शारिक अन्सारी (Mohammad Shariq Ansari) (२३) अशी अटक आरोपींची नावे असून पोलिसांनी या दोघांजवळून चोरीची केटीएम बाईक जप्त केली आहे. (Crime News)
अँटॉप हिलमधील सी.जी.एस. कॉलनीत वास्तव्यास असलेला अबू संयम मोहम्मद हसीन मेहबूब शेख (२५) हा तरुण सेल्समन म्हणून नोकरी करतो. यातील आरोपी मोहम्मद सदाफ (Mohammad Shadab) आणि मोहमद शारिक यांनी अबू याला खोटी ओळख सांगून केटीएम बाईक १ लाख २० हजार रुपयांना विक्री केली. यासाठी आरोपींनी खोटी कागदपत्रे, नंबरप्लेट बनवली होती. बाईक खरेदी केल्यानंतर अबूने ती घराजवळ पार्क केली. हीच बाईक दोघांनी पुन्हा चोरी करुन पळ काढला. (Crime News)
नवीन विकत घेतलेली बाईक चोरी झाल्यानंतर अबूने अँटॉप हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन अँटॉप हिल पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे गोव्यात पळून गेल्याची माहिती अँटॉप हिल पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गोव्यातील स्थानिक म्हापसा पोलिसांच्या मदतीने अँटॉप हिल पोलिसांनी आरोपी मोहम्मद सदाफ आणि मोहमद शारिक यांना ताब्यात घेतले. (Crime News)
मोहम्मद सदाफ आणि मोहमद शारिक हे केटीएम बाईक चोरी करत होते. त्यानंतर ओएलएक्स साईटवर केटीएम बाईक विक्रेत्यांना बाईक खरेदीच्या बहाण्याने संपर्क साधून त्यांच्याकडून कागदपत्राचे फोटो घ्यायचे. त्या आधारे बनावट कागदपत्रे आणि स्मार्टकार्ड बनवून चोरी केलेल्या बाईकला त्या कागदपत्रांवरील क्रमांकाची नंबरप्लेट बसवून त्यांची विक्री करत होते. (Crime News)
बाईक विक्री करताना दोघेही बाईकमध्ये जीपीएस सिस्टीम बसवून तिचा माग काढत ती पुन्हा चोरी करून पुन्हा नव्याने बनावट कागदपत्रे बनवून नवीन शहरात जाऊन विक्री करत होते. आरोपी मोहम्मद सदाफ आणि मोहमद शारिक यांनी अशा प्रकारे मुंबईसह लखनऊ आणि हैद्राबाद येथे गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. (Crime News)
पोलिसांनी आरोपी मोहम्मद सदाफ आणि मोहमद शारिक यांच्याजवळून गुन्ह्यातील केटीएम बाईकसह विविध कागदपत्रे, नंबरप्लेट आणि एक लाख ६० हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल जप्त केले आहेत. दोन्ही आरोपी हे उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यात असलेल्या देहत करवली, कुंठरा नगरचे रहिवासी असून दोघांकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Crime News)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.