Crime News : ‘गुगल पे’ मुळे  गुरूसिद्धपाचा मारेकरी सापडला, नालासोपाऱ्यातून अटक

372
Crime News : 'गुगल पे' मुळे  गुरूसिद्धपाचा मारेकरी सापडला, नालासोपाऱ्यातून अटक
Crime News : 'गुगल पे' मुळे  गुरूसिद्धपाचा मारेकरी सापडला, नालासोपाऱ्यातून अटक
  • मुंबई – संतोष वाघ
वरळीत झालेल्या पोलीस खबरीचा मारेकऱ्याचा शोध गुगल पे (Google Pay) (जी-पे) मुळे लागला आहे, गुन्हे शाखेने अटक केलेल्या मोहम्मद फिरोज अन्सारीने एका पान टपरीवरून गुटखा खरेदी केला होता, गुटख्याचे पैसे त्याने गुगल पे ने केल्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी गुगल पे च्या मोबाईल क्रमांकावरून  मारेकऱ्याचा माग काढत नालासोपारा येथून मोहम्मद फिरोज अन्सारी (Mohammad Feroze Ansari) याला ताब्यात घेऊन अटक केली. (Crime News)
आरटीआय कार्यकर्ता तसेच पोलीस खबरी असणारा विलेपार्ले येथे राहणारा गुरुसिद्धपा वाघमारे (Gurusiddappa Waghmare) उर्फ चुलबुल पांडे याची बुधवारी वरळीच्या सॉफ्ट टच स्पा मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती, या हत्येनंतर मारेकऱ्यांनी येथून पळ काढला होता. या हत्येपूर्वी  मंगळवारी रात्री गुरुसिद्धपा वाघमारे याने स्पा मधील तीन कर्मचारी यांना सायनच्या अपर्णा हॉटेल मध्ये पार्टी दिली होती, त्या ठिकाणी पार्टी केल्यानंतर रात्री १ वाजता गुरू स्पाच्या महिला कर्मचाऱ्यासह वरळीतील स्पा येथे आला होता, व इतर दोघे कर्मचारी सायन येथूनच निघून गेले होते. त्यानंतर दोन अनोळखी व्यक्ती रेनकोट घालून स्वाफ्ट टच स्पा मध्ये आले व त्यांनी गुरू सिद्धपा याची धारधार शस्त्राने हत्या करून पळ काढला होता. (Crime News)
मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ आणि कक्ष ५ च्या पथकांनी स्पाच्या परिसरातील तसेच हॉटेल अपर्णा आणि आसपासचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते, या फुटेज तपासत असताना सायन येथील अपर्णा हॉटेल परिसरातील एका पानटपरीवर आणि स्पा परिसरातील फुटेज मध्ये आढळून आलेले संशयित यांच्यात साम्य आढळून आले. गुन्हे शाखेच्या पथकाने सायन येथील पानटपरी वाल्याकडे आपला मोर्चा वळवून त्याच्याकडे या दोन जणांची चौकशी केली असता, पानटपरी वाल्याने त्यांना ओळखून त्यांनी त्याच्याकडे गुटखा खरेदी केला होता व गुटख्याचे  ७० रुपये त्यातील एकाने  गुगल पे ने दिले होते अशी माहिती पान टपरी मालकाने दिली. (Crime News)
गुन्हे शाखेने पान टपरी मालकाचे गूगल पे (Google Pay) खाते तपासले असता त्यांना ७० रुपयांचे ट्रानजेक्शन आढळून आले, पोलिसांनी गुगल पे चा मोबाईल क्रमांक आणि खात्याची माहिती घेऊन संशयितांचा माग काढला असता गुटखा घेणाऱ्याचे मोबाईल लोकेशन घटनेच्या रात्री वरळी नाका सॉफ्ट टच स्पा येथे आढळून आले, पोलीस पथकाने या मोबाईल लोकेशनचा माग काढत नालासोपारा (Nalasopara) गाठून बुधवारी रात्री मोहम्मद फिरोज अन्सारी (Mohammad Feroze Ansari) याला ताब्यात घेतले, त्याच्या चौकशीत साकीब अन्सारी याचे नाव समोर आले, व साकीब हा दिल्ली पळून गेला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ दिल्लीकडे रवाना झाले आणि राजस्थान मधील कोटा येथून साकीब आणि त्याच्या सोबत असलेल्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. (Crime News)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.