परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या तस्करांना मदत करणाऱ्या सीमा शुल्क विभागाच्या हवालदारांसह तीन जणांना मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या तिघांजवळून ३ किलो सोनं जप्त करण्यात आले असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे. (Crime News)
मनीष वालेचा , मुकेश वालेचा आणि सुरेश कदम असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून मनीष आणि मुकेश हे दोघे सख्खे भाऊ असून सुरेश कदम हा सीमा शुल्क विभागात हवालदार म्हणून नोकरीला आहे. वालेचा बंधू हे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे राहणारे आहे. (Crime News)
वालेचा बंधू हे सीमा शुल्क विभागाच्या कर्मचारी तसेच हवालदार यांना हाताशी धरून दुबई येथून आणलेल्या सोन्याची तस्करी करीत असे, शनिवारी दुबई येथून आलेल्या वालेचा बंधू यांना सीमा शुल्क विभागाच्या अधिकारी यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते, त्याच्याजवळील सामानाची झडती घेण्यात आली मात्र त्याच्याकडे सीमा शुल्क बुडवून आणलेले कुठलेही सामान मिळून आले नाही.मात्र सीमा शुल्क विभागाला या दोघांवर असलेल्या संशयावरून त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता , त्यांनी दुबई येथून सीमा शुल्क बुडवून आणलेले सोने वॉशरूम मध्ये सीमा शुल्क विभागाचे हवालदार सुरेश कदम यांच्याकडे दिले आहे, आणि हे सोन्याचे पाऊच ते विमानतळावरून बाहेर काढून देण्यास त्यांना मदत करणार असल्याची माहिती वालेचा बंधूनी दिली. (Crime News)
(हेही वाचा- Arjun Erigaisi : अर्जुन एरिगसीने कमावले २,८०० एलो रेटिंग गुण, आनंद नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू)
दरम्यान सीमा शुल्क विभागाच्या अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून हवालदार सुरेश कदम यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३ किलो सोन्याचे तीन पाऊच जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सीमा शुल्क विभागाने तिघांना अटक केली असून सुरेश कदम हे कधीपासून तस्करांना मदत करत आहे, व आता पर्यत त्यांनी कुणाकुणाला या प्रकारे मदत केली याची चौकशी सुरू असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे. (Crime News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community