Crime News : ठाण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार करुन खून; ३ जणांना अटक

321
Crime News : चोरीच्या बाईक्सला जीपीएस लावून विकायचे; पुन्हा तीच बाईक चोरी करून तिसऱ्याला विकायचे
Crime News : चोरीच्या बाईक्सला जीपीएस लावून विकायचे; पुन्हा तीच बाईक चोरी करून तिसऱ्याला विकायचे

ठाण्यातील शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून घर सोडलेल्या ३२ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन ३ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. शीळ डायघर पोलिसांनी ४८ तासांत या गुन्ह्याची उकल करून तीन जणांना या प्रकरणी अटक केली आहे. या घटनेने शीळ डायघर परिसर हादरला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Crime News)

ठाणे जिल्ह्यातील पडले शिळगाव येथील घोळ गणपती मंदिराच्या खालच्या बाजूला असलेल्या खोलगट भागात ९ जुलै रोजी सकाळी शीळ डायघर पोलिसांना ३२ वर्षीय एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अर्धनग्न अवस्थेत असलेल्या या महिलेचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला, शविच्छेदन अहवालात या महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. (Crime News)

(हेही वाचा – Monsoon Session : प्रविण दरेकरांचा विरोधकांना टोला; म्हणाले…)

शीळ डायघर पोलिसांनी अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी विशेष पथक तयार करून या महिलेची ओळख पटविण्यात आली. बळीत महिला ही बेपत्ता झाल्याची तक्रार नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी दाखल केली होती. बळीत महिला ही ६ जुलै रोजी घरगुती वादातून घर सोडून निघून ती पडले शिळगाव येथील घोळ गणपती मंदिर येथे आश्रयाला आली होती. पोलीस पथकाने मंदिर परीसरात सेवा करणारे श्यामसुंदर शर्मा (६२), संतोष कुमार मिश्रा (४८) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. (Crime News)

या दोघांनी त्यांचा तिसरा सहकारी राजकुमार पांडे (५४) याच्यासोबत मिळून बळीत महिलेला आश्रय देण्याच्या नावाखाली तिला चहात गुंगीचे औषध देऊन तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, बळीत महिला शुद्धीवर येताच तिने आरडाओरड करताच तिघांनी तिला मारहाण करून तिचे डोके जमिनीवर आदळून गळा आवळून तिचा खून करुन मृतदेह मंदिरापासुन काही अंतरावर फेकण्यात आला होता. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक करून त्यांच्याविरूद्ध हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आणि सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.