Versova Hit and Run : वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्या एकाला मोटारीने चिरडले, दोघांना अटक

131
Versova Hit and Run : वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्या एकाला मोटारीने चिरडले, दोघांना अटक

वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्या ३६ वर्षीय रिक्षाचालकाला एका मोटारीने चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी पहाटेच्या सुमारास घडला आहे. या अपघातानंतर पळून गेलेल्या मोटार चालकासह दोन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले असून तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. (Versova Hit and Run)

(हेही वाचा – E-Bikes मुंबई पोलिसांच्या रडारवर; वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कारवाई)

गणेश यादव असे अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर रहिवासी संघ येथे राहण्यास होता. गणेश आणि मित्र बबलू श्रीवास्तव हे दोघे घरात उकडत असल्यामुळे रविवारी रात्री वर्सोवा चौपाटीवर झोपण्यासाठी गेले होते. सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एमएच-३१-एफई-३०३३ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची जीप ही मोटार गणेशला चिरडत पुढे गेली आणि थांबली, जोराचा आवाज होताच, बाजूला झोपलेला बबलू हा घाबरून उठला, आणि समोरून दृश्य बघून तो घाबरला. दरम्यान पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून दोन जण बाहेर आले व त्यांनी गणेशला उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु गणेशची हालचाल होता नसल्याचे बघून दोघांनी मोटारीसह तेथून धूम ठोकली. (Versova Hit and Run)

याघटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी अपघातास्थळी धाव घेऊन जखमी गणेशला कूपर रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वर्सोवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १०५ (सदोष मनुष्यवध), १२५ (अ) (जीव धोक्यात आणणे), २३९ (माहिती देण्यास बांधील असलेल्या व्यक्तीने गुन्ह्याची माहिती देणे हेतुपुरस्सर वगळणे), २८१ (उतावळेपणा) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्सोवा पोलिसांनी एसयूव्ही चालक निखिल जावळे (३४) या नागपूर येथील, कॅब सेवा चालविणारा, आणि त्याचा मित्र, शुभम डोंगरे (३३, रा. ऐरोली, जो कॅब व्यवसायात भागीदार आहे) यांना अटक केली आहे. आरोपींना मंगळवारी अंधेरी कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Versova Hit and Run)

(हेही वाचा – CC Road : दादरच्या समर्थ व्यायाम मंदिर मार्गाला तडे, दोन वर्षांतच झाली रस्त्याची दुरवस्था)

चालक आणि त्याच्या मित्राला त्यांनी गुन्हा केल्यानंतर काही तासांतच अटक करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी ते मद्यधुंद असल्याचे दिसत नाही. घटना घडली तेव्हा ते दारूच्या नशेत होते की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. असे डीसीपी (झोन ९) राजतिलक रोशन यांनी सांगितले. या घटनेतून गणेश यादव याचा मित्र बबलू श्रीवास्तव हा थोडक्यात बचावला असून त्याला मानसिक धक्का बसला आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना परवानगी नसतानाही, मोटार झोपड्यांमधून जाणाऱ्या एका अरुंद मार्गाने आत शिरली आणि समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या दोघांवर धावून गेली. (Versova Hit and Run)

या घटनेचे साक्षीदार असलेल्या स्थानिकांना संशय आहे की दोन्ही आरोपी दारूच्या नशेत होते. एका स्थानिकाने त्याच्या मोबाईलवर वाहनाचा क्रमांकाचा फोटो काढला, ज्यामुळे वर्सोवा पोलिसांना घटनेच्या तीन तासांत दोघांचा माग काढण्यात मदत झाली. वर्सोवा पोलिसांनी नागपुरातील सतीश एस नावाच्या व्यक्तीची मोटार जप्त केली आहे. जावळे आणि डोंगरे यांनी त्यांचा कॅब व्यवसाय चालवण्यासाठी सतीशकडून मोटार कंत्राटावर घेतली होती. एका ग्राहकाला सोडल्यानंतर जावळे आणि डोंगरे यांना भेटण्यासाठी मुंबईत आले असून त्यांनी वाहनांसाठी प्रतिबंधित असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश केल्यामुळे ही घटना घडली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Versova Hit and Run)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.