कर्नाटकातील बल्लारीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी ६८ चांदीच्या विटा, ३ किलो सोने, १०३ किलो चांदीचे दागिने आणि ५.०६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी एका व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. (CRIME)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दागिन्यांच्या दुकानाचा मालक असलेल्या नरेशच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांना हवाला लिंक असल्याचा संशय आहे आणि त्यांनी कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ९८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासाचे निष्कर्ष पुढील चौकशीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवले जातील, असे पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –