बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या काळात अवैध पैशांचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख नाकाबंदी केली आहे. खामगाव चेक पोस्टवर पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून ही रोकड नेली जात होती. वाहनांची तपासणी करत असताना कारमध्ये लोखंडी पेटी सापडली. पोलिसांनी कारचालकाकडे याबाबत विचारपूस केली. त्याने ही रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची असल्याचे सांगितले. परंतु त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे सापडली नाहीत. दरम्यान, सध्या पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली आहे. यावेळी कसल्याच प्रकारचे बारकोड संबंधिताकडे नसल्याने अनेक संशय व्यक्त होत आहेत.
(हेही वाचा – Rahul Gandhi: राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होणारा ‘हा’ व्हिडियो पहा)
ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त
निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने शनिवारी, (४ मे) ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त केली. दुधाच्या टेम्पोतून ही रक्कम नेली जात होती. ठाणे आणि नवी मुंबईतील निवडणुकीकरिता ही रक्कम आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.