CRIME POST: मुंबईत अंमली पदार्थांच्या धंद्यात नायजेरियन्सचा मोठ्या प्रमाणात समावेश

नायजेरियनचे गट मुंबईत ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी विविध पद्धती वापरतात. ज्यामध्ये समुद्र आणि हवाई माल तसेच मानवी तस्करांचा वापर केला जातो.

199
CRIME POST: मुंबईत अंमली पदार्थांच्या धंद्यात नायजेरियन्सचा मोठ्या प्रमाणात समावेश
CRIME POST: मुंबईत अंमली पदार्थांच्या धंद्यात नायजेरियन्सचा मोठ्या प्रमाणात समावेश

शिक्षण आणि पर्यटनाच्या नावाखाली नायजेरियन्स भारतात येतात. मोठे व्यावसायिक, महिला, तरुण, तरुणी आणि काही ज्येष्ठ नागरिकही नायजेरियन गुन्हेगारांना बळी पडतात. अलीकडेच लाखो तरुणांना त्यांना अंमली पदार्थांचे (CRIME POST) व्यसनी केल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. मुंबईत अमली पदार्थांच्या बेकायदेशीर धंदे, सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नायजेरियन्सचा समावेश असल्याचे समोर आले आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत शिक्षण आणि पर्यटनाकरिता नायजेरियन्स नागरिक येतात. त्यानंतर ते येथे येण्यासाठी काढलेला स्वतःचा पासपोर्ट फाडून फेकून देतात. त्यामुळे त्यांना मुंबईच्या हद्दीतून बाहेर काढणे पोलिसांसाठी एक आव्हान असते. याचाच फायदा घेऊन हे नायजेरियन्स नागरिक वर्षानुवर्षे मुंबई तसेच ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात राहून बेकायदेशीर धंदे करतात. पोलिसांनी त्यांना गुन्हेगारी आरोपाअंतर्गत अटक केली असता कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते. या कायदेशीर प्रक्रियांचे निराकरण होईपर्यंत त्यांना त्यांच्या मायदेशी परत जाण्यापासून प्रतिबंधित केले जाते.

(हेही वाचा – AWES : आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे उद्दिष्ट आणि दूरदॄष्टी)

वर्णामुळे ओळखणे कठीण…
बहुतेक नायजेरियन नागरिक मुंबईबाहेर राहणे पसंत करतात. विशेषत: मीरा रोड, वसई-विरार, उलवे, वाशी आणि खारघर यासारख्या भागात त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असते. ते संपूर्ण शहरात काम करतात. मुख्यत: त्यांच्या एकसारख्या वर्णामुळे नायजेरियन नागरिकांना ओळखणे कठीण असते. त्यामुळे त्यांना अटक करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असते.

अमली पदार्थ वितरण नेटवर्क
पोलिसांनी सांगितले की, नायजेरियन नागरिकांनी एक पद्धतशीर आणि गुप्तपणे अमली पदार्थ वितरण नेटवर्क स्थापित केले आहे. प्रामुख्याने कोकेन, एमडी (मेफेड्रोन), एलएसडी (लाइसेर्जिक ऍसिड डायथिलामाइड), आणि एमडीएमए (एक्स्टसी) सारख्या पदार्थांचा व्यवहार करतात. या कारवायांचे सूत्रधार नायजेरिया किंवा इतर आफ्रिकन देशांतील असल्याचे मानले जाते. नायजेरियनचे गट मुंबईत ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी विविध पद्धती वापरतात. ज्यात समुद्र आणि हवाई माल तसेच मानवी तस्करांचा वापर करतात.

समस्येच्या निराकरणासाठी पोलिसांचा सल्ला…
मानवी तस्कर हे शरीराच्या अंतर्वस्त्रात ड्रग्ज लपवतात, त्यामुळे ते शोधणे आव्हानात्मक होते. ड्रग्स तस्करीत पकडले जाऊ नये म्हणून ते व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या मूळ भाषेत संवाद साधतात. ते आपल्या वितरण व्यवस्थेत कोणत्याही भारतीयांना सामील करून घेत नाही, कारण त्यांना भारतीयांवर विश्वास नसल्यामुळे ते त्यांना आपल्या गटात सामील करून घेत नाही. काही नायजेरियन पुरुषांनी स्थानिक भाषेचा अवलंब करून स्थानिक किंवा मराठी तरुणांशी विवाह केल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीमधील सहकार्याचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.