Crime : पाच वर्षांपासून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला अटक

178
Crime : पाच वर्षांपासून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला अटक
Crime : पाच वर्षांपासून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला अटक

मुलीच्या आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतील महालक्ष्मी येथे घडली आहे. महालक्ष्मी येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर मागील पाच वर्षापासून पित्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा ४६ वर्षीय पित्यावर बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा (Crime) दाखल करू नये त्याला अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – गांधीहत्येमुळे सावरकर, ब्राह्मण समाज आणि हिंदुत्व बदनाम; Sharad Ponkshe यांनी व्यक्त केली खंत)

ताडदेव पोलीस ठाण्यात २ ऑक्टोबर रोजी १७ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता, गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन तीला कक्ष कार्यालयात आणून चौकशी केली असता, तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पीडित मुलगी ही महालक्ष्मी येथे आई वडील आणि मोठ्या भावासोबत राहण्यास आहे, आई मानसिक रुग्ण आहे. पीडित मुलीचे वडील कंत्राटी कर्मचारी आहे, मागील काही वर्षांपासून पीडित मुलीचे पित्याकडून लैंगिक शोषण केले जात होते, हा प्रकार २०१९ पासून सुरू होता, भीतीपोटी मुलगी वडिलांचा हा त्रास सहन करीत होती, वडिलांचे हे कृत्य मुलीने वडिलांच्या मोबाईल फोन मध्ये कैद केले होते, व मित्राला तो व्हिडीओ पाठवून वडिलांकडून होत असलेल्या त्रासातून सुटका करण्याची विनंती केली होती.

(हेही वाचा – Marathi Bhasha Abhijat Darja : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले निर्णयाचे स्वागत)

२ ऑक्टोबर रोजी अखेर वडिलांच्या या लैंगिक शोषण ला कंटाळून अखेर पीडित मुलीने घर सोडले आणि मित्राकडे निघून गेली होती. मुलगी घर सोडून गेल्यामुळे पित्याने ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित मुलीने दिलेल जबाब आणि पित्याच्या कृत्याच्या व्हिडीओच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने पित्याचा शोध घेऊन बुधवारी रात्री पित्याला ताब्यात घेऊन ताडदेव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ताडदेव पोलिसांनी पित्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा  दाखल करून पित्याला अटक करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.