Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शाखाप्रमुखाची हत्या

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

183
Crime : गिरगावात भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

सध्या राज्यातील गुन्हेगारीच्या (Crime) प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. अशातच एक खळबळजनक बातमी समोर आली नाही. उल्हासनगरमध्ये एकाची हत्या (Crime) करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शाखाप्रमुख शब्बीर शेख याची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात काल म्हणजेच शुक्रवार २६ मे रोजी मध्यरात्री ही हत्या झाली. पाच ते सहा जणांनी मिळून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता संपूर्ण उल्हासनगर येथे तणावाचे वातावरण आहे.

(हेही वाचा – CM’s office Fraud : ‘हॅलो, मी सीएम कार्यालयातून बोलतोय’ – मुख्यमंत्री पदाच्या नावाचा वापर करून शैक्षणिक संस्थांना गंडवणाऱ्याला अटक)

पूर्व वैमन्यासातून हत्या (Crime) झाल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आली आहे. हिललाईन पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. जय जनता कॉलनी येथे एका जुगाराच्या क्लब बाहेर ही हत्या झाली आहे. शब्बीर शेख असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

शब्बीर शेख जुगाराचा क्लब चालवत होता. त्याला नुकतेच शिंदे गटाचे शाखाप्रमुख हे पद देण्यात आले होते. या घटनेत हल्लेखोरांनी (Crime) चॉपर, तलवार असे धारदार हत्यारांचा वापर केल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी शब्बीर शेख याच्यावर दहा ते बारा वेळा वार केला. जखमी अवस्थेत शेख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हेही पहा – 

शेख यांची परिस्थिती गंभीर बनल्यामुळे त्यांना कल्याण येथील एका रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र,उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.