Crime : खबरी समजून तिघांना विवस्त्र करून दिला विजेचा शॉक; ३ जणांना अटक

70
Crime : खबरी समजून तिघांना विवस्त्र करून दिला विजेचा शॉक; ३ जणांना अटक
  • प्रतिनिधी 

अंधेरी पश्चिम येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ जणांना महानगरपालिकेचे खबरी समजून त्यांना विवस्त्र करून त्यांच्या गुप्तांगाला विजेच्या बॅटरीने शॉक देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ काढून तो समाज माध्यमावर व्हायरल देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी अंधेरीतील डी. एन. नगर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. (Crime)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : महाराष्ट्रात वातावरण फिरलंय; काँग्रेस नेत्याची कबुली)

या घटनेतील पीडित चारही व्यक्ती रियल इस्टेट एजंट असल्याची माहिती समोर आली आहे, असून आरोपी हे बांधकाम कंत्राटदार असल्याचे समजते. अंधेरी पश्चिम डेरावाला मॅन्शनजवळील भारदवाडी या ठिकाणी चाळीचे बेकायदेशीररित्या काम सुरू आहे. पीडित व्यक्ती त्या चाळीचे बांधकाम बघत होते, त्यातील एकाने या अनधिकृत बांधकामाचे फोटो देखील काढले. हा प्रकार बेकायदेशीर चाळ बांधणाऱ्या भारदवाडीतील रहिवासी सत्तार तुराक (५४), अझीझ तुर्राक, (५०), आणि फिरोज तुराक, (५३) यांनी या चौघांना पकडले. हे चौघे मुंबई महानगरपालिकेचे खबरी असून बांधकामाचे फोटो काढून ते महानगरपालिकेला पाठवणार असल्याचा संशयावरून या चौघांना एका खोलीत आणण्यात आले. (Crime)

(हेही वाचा – IPL Mega Auction : रिषभ पंतसाठी या तीन संघांनी लावली ‘फिल्डिंग’)

त्या ठिकाणी या तिघांना विवस्त्र होऊन मारहाण केली, एवढ्यावर न थांबता तिघांनी विजेच्या बॅटरीने त्यांच्या गुप्तांगाला शॉक देऊन मारहाण केली. या तिघांनी या सर्व घटनेचा व्हिडीओ मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. डी. एन. नगर पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेऊन पीडितांच्या तक्रार दाखल करून सत्तार तुराक (५४), अझीझ तुर्राक, (५०), आणि फिरोज तुराक, (५३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.