ट्रेन मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला ७ ते ८ जणांच्या टीसींच्या टोळीने मारहाण केल्याची घटना बोरिवली रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी ७ ते ८ अनोळखी तिकीट तपासनीसांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या टीसीची ओळख पटविण्यासाठी घटनस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खुपेरकर यांनी दिली आहे. (Crime)
जुबेर अहमद (२७) असे मारहाण करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. जुबेर हा पालघर येथे राहणारा आहे, सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जुबेर हा ट्रेनने बोरिवली रेल्वे येथे आला असता तिकीट तपासनीस यांनी त्याच्याकडे प्रवासाचे तिकीट विचारले, परंतु जुबेरकडे तिकीट नसल्यामुळे त्याला विनातिकीट प्रवास प्रकरणी टीसीने ताब्यात घेऊन दंड भरण्यासाठी फलाट क्रमांक ८ येथील टीसी कार्यालयात आणले. (Crime)
(हेही वाचा – Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर सोने धाडकन कोसळले!)
जुबेर यांच्याकडे टीसीने दंडाची रक्कम भरण्यास सांगितले असता टीसी आणि जुबेर यांच्यात शाब्दिक वाद झाला, या वादातून कार्यालयात बसलेल्या ७ ते ८ टीसीनी जुबेरला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. जुबेरने दंडाची रक्कम भरून स्वतःची सुटका करून थेट बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे गाठले. रेल्वे पोलीस ठाण्यात जुबेर याने त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी जुबेरला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवुन बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात ७ ते ८ अनोळखी टीसी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या टीसीची ओळख पटविण्यासाठी टीसी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेजच्या आधारे मारहाण करणाऱ्या टीसीची ओळख पटविण्यात येत असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खुपेरकर यांनी दिली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community