Crime : पत्नीची दहशत; बँकॉक वारी लपवण्याच्या नादात पतीला तुरुंगवारी

285
Crime : पत्नीची दहशत; बँकॉक वारी लपवण्याच्या नादात पतीला तुरुंगवारी

पत्नीची दहशत काय असते, हे मुंबई विमानतळावर घडलेल्या एका घटनेवरून समोर आले आहे. मित्रांसोबत केलेली ‘बँकॉक वारी’ पत्नीपासून लपवून ठेवण्यासाठी साताऱ्यातील एका व्यावसायिकाने पहिल्या ‘बँकॉक’ वारीची पासपोर्टमधील पाने फाडल्यामुळे, दुसऱ्यांदा बँकॉक वारीला निघालेल्या या व्यावसायिकावर तुरुंगवारी करण्याची वेळ आली. या व्यावसायिकाला मुंबईच्या विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्याने पकडून सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्यावसायिकावर पोलिसांनी फसवणुकीचा आणि पासपोर्ट अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.(Crime)

सातारा येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय व्यावसायिकाने २०२३ आणि २०२४ दरम्यान मित्रांसोबत अनेक वेळा थायलंड, बँकॉक वारी केली. या वारीबाबत त्याने पत्नीला कळवले नव्हते, व्यवसायानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे सांगून बँकॉक वारीचे गुपित त्याने पत्नीपासून दडवून ठेवले होते. पत्नीला बँकॉक वारीची भनक लागू नये म्हणून या व्यवसायिकाने त्याच्या पासपोर्टमधील संबंधित शिक्का असलेली पाने (पृष्ठे) फाडून टाकली आणि त्या ऐवजी कोरी पाने चिटकवली होती. (Crime)

(हेही वाचा – कैद्याकडे मागितली लाच; Nashik Jail मधील दोन डॉक्टरांना लाच घेताना अटक)

हे पती महाशय पत्नीला व्यवसायानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे सांगून ११ जुलै रोजी पुन्हा बँकॉक वारीसाठी निघाले असता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्याने पासपोर्टमधील फेरफार प्रकरणी ताब्यात घेतले. इमिग्रेशन अधिकाऱ्याला पासपोर्ट सादर करण्यात आला असता पासपोर्टची १२ पाने फाडून त्यात फेरफार करण्यात आले होते. व्यवसायिकाला इमिग्रेशन अधिकाऱ्याने सहार पोलिसांच्या ताब्यात दिले, पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता बँकॉकला गेल्याचे पत्नीला कळू नये म्हणून पासपोर्टची पाने फाडून त्याजागी कोरी पाने चिटकवली अशी कबुली व्यावसायिकाने पोलिसांना दिली. सहार पोलिसांनी व्यवसायिकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अन्वये फसवणूक आणि भारतीय पासपोर्ट कायदा १९६७च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.