Crime : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटला मदत करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर बदलीची कारवाई

107
Crime : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटला मदत करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर बदलीची कारवाई
Crime : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटला मदत करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर बदलीची कारवाई

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटला पाठीशी घातल्याचा ठपका सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनावणे (Dhananjay Sonawane) यांच्यावर ठेवण्यात आला आहे, सोनावणे यांची सहार पोलीस ठाण्यातून सशस्त्र विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा तपास मुंबई गुन्हे (Crime) शाखेकडून करण्यात येत असून गुन्हे शाखेच्या तपासात या रॅकेटमधील आरोपींविरुद्ध कारवाई करताना सहार पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय सोनावणे (Dhananjay Sonawane) यांनी कथित निष्काळजीपणा दाखविल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Crime)

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीने शेकडो भारतीयांना “डंकी” मार्गाने बेकायदेशीरपणे अमेरिकेसारख्या देशांमध्ये पाठवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. गुन्हे शाखेने या टोळीच्या अनेक सदस्यांना अटक केली आहे. बनावट पासपोर्ट आणि व्हिसाचा वापर करून अमेरिका, कॅनडा, तुर्की, नेदरलँड्स आणि पोलंडसारख्या देशांमध्ये किमान ८० व्यक्तींना बेकायदेशीरपणे पाठवल्याचे तपासात उघडकीस आले होते. (Crime)

(हेही वाचा – Tiger Memon ची संपत्ती केंद्र सरकार जप्त करणार ; विशेष न्यायालयाचा आदेश)

गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान, धक्कादायक माहिती समोर आली, सहार पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनावणे (Dhananjay Sonawane) यांनी आरोपींपैकी एकाच्या विरुद्ध पूर्वीच्या तस्करीच्या प्रकरणाची चौकशी केली नव्हती, धनंजय सोनावणे यांनी या आरोपीला सहकार्य केले होते अशी माहिती तपासात समोर आल्यानंतर सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनावणे (Dhananjay Sonawane) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. (Crime)

“आम्ही सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय सोनावणे (Dhananjay Sonawane) यांची स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमध्ये बदली केली आहे,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. “वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या निष्काळजीपणाचे आढळून आले, म्हणून गुन्हे शाखेकडून अहवाल मिळाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली कारण हे रॅकेट काही काळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत होते.

(हेही वाचा – Fishing Boats साठी मार्च महिन्यात १ लाख ६८ हजार कि. ली. डिझेल कोटा मंजूर)

बनावट पासपोर्ट (fake passport) आणि व्हिसाचा वापर करून मानवी तस्करी करणाऱ्या एका टोळीने किमान ८० व्यक्तींना अमेरिका, कॅनडा, तुर्की, नेदरलँड्स आणि पोलंड सारख्या देशांमध्ये बेकायदेशीरपणे पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. बनावट पासपोर्ट आणि व्हिसाचा वापर करून परदेशात पाठवण्यासाठी ही टोळी प्रति व्यक्ती ३० लाख ते ५० लाख रुपये आकारत असे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८ (४) (फसवणूक), ३१९ (२) (व्यक्तिरूपाने फसवणूक), ३३६ (२) (बनावट), ३३७ (सार्वजनिक रेकॉर्ड, न्यायालयीन रेकॉर्ड किंवा ओळखपत्राची खोटी माहिती), ३४० (२) (खोटे कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड खऱ्या म्हणून वापरणे) आणि ६१ (२) (गुन्हेगारी कट) आणि भारतीय पासपोर्ट कायदा, १९६७ च्या कलम १२ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला.गेल्या महिन्यात बँकॉकहून मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर अंधेरी पूर्वेतील रहिवासी रोशन भास्कर दुधवडकर (Roshan Bhaskar Dudhvadkar) याला इमिग्रेशन विभागाने अटक केल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय असल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने दुधवडकरला ताब्यात घेतले आणि त्यानंतर अरुण दुधवडकर, अजित पुरी, इम्तियाजली मोहम्मद हनीफ शेख, सुधीर सावंत आणि संजय चव्हाण या इतर आरोपींना अटक केली.

निष्काळजीपणासाठी एसपीआय सोनावणे यांची बदली केल्यानंतर, हे प्रकरण निष्पक्ष चौकशीसाठी सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आले आहे, असे आधी उद्धृत केलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.