पाच वर्षांनी सापडला अत्याचारी बसचालक

104

विक्रोळी हायवेवर एका खाजगी बसमध्ये महिलेवर बलात्कार करून पळून गेलेल्या बसचालकाला ५ वर्षांनी कर्नाटक राज्यातून अटक केली आहे, मुंबईच्या गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने हि कारवाई केली आहे. अनुपम अरुण दास (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अनुपम हा मूळचा आसाम राज्यात राहणारा आहे, मुंबईत एका खाजगी बसवर चालक म्हणून काम करीत होता. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्री विक्रोळी पूर्वद्रुतगती महामार्गावर एका महिला ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी बसची वाट पहात उभी होती, त्यावेळी आरोपी अनुपम हा तिच्याजवळ आला व मी तुला तुझ्या ठिकाणी सोडतो असे सांगून तो रस्त्याच्या कडेला थांबलेल्या खाजगी बसमध्ये घेऊन गेला, या महिलेला त्याने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करून वाटेत तिला सोडून धूम ठोकली होती.

(हेही वाचा केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, मग वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय? – अजित पवार)

याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विक्रोळी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी संपूर्ण  ठाणे ते सायन दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून बसचालकाची माहिती काढण्यात आली होती. मूळचा आसाम  राज्यातील असणारा आरोपी अनुपमचा शोध घेण्यासाठी विक्रोळी पोलिसांचे पथक आसाम येथे दाखल झाले होते, परंतु तो आसाम मध्ये आलाच नसल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांना रिकाम्या हाती परतावा लागले होते.

तब्बल पाच वर्षांनी विक्रोळी येथील गुन्हयातील एक आरोपी कर्नाटक राज्यातील मैसूर येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ७च्या पथकाला मिळाली होती. प्रपोनि .महेश तायडे यांचं मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कर्नाटकातून अनुपम दास याला अटक केली. कर्नाटकात वेगवेगळ्या नावाने वावरत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा ताबा विक्रोळी पोलिसांकडे देण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.